Pandharpur Live News :डॉक्टर , सी ए , शेतकरी बांधव हे देशाच्या आर्थिक विकासाचे आधारस्तंभ : आमदार प्रशांत परिचारक

Pandharpur Live News :डॉक्टर , सी ए , शेतकरी बांधव हे देशाच्या आर्थिक विकासाचे आधारस्तंभ : आमदार प्रशांत परिचारक

Loading

दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि . पंढरपूर आयोजित डॉक्टर , सी ए व शेतकरी बांधव यांचा स्नेहमेळावा पंढरपूर अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृह येथे नुकताच संपन्न झाला . कार्यक्रमाचेप्रसंगी श्री. पांडुरंग व धन्वंतरीमातेच्या प्रतिमेचे पूजन आमदार प्रशांत परिचारक , आय एम ए च्या अध्यक्षा डॉ. सौ ऋतुजा उत्पात , निमा चे अध्यक्ष डॉ. अमरसिंह जमदाडे, डॉ. श्री दत्ता साळुंखे ,होमोपेथीक असोशिएशसन चे अध्यक्ष डॉ. अनिल आसबे, फ़िजिओ थेरपी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आशिष चव्हाण , डॉ. महेश देशपांडे , डॉ. बजरंग धोत्रे , सी ए शिरीष कोठाडीया, बँकेचे चेअरमन श्री सतीश मुळे , व्हा चेअरमन सौ माधुरी जोशी , बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उमेश विरधे, संचालिका डॉ. संगीता पाटील यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाले .


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उमेश विरधे म्हणाले की, डॉक्टर्स हे जीवनाच्या लढाईमधील खरे योध्ये आहेत ऊन, वारा , पाऊस या तिन्ही ऋतूत ते सेवेसाठी तत्पर असतात, ज्ञानाच्या व सेवाभावी वृत्तीच्या जोरावर माणसातील आशा व आत्मविश्वास टिकवून ठेवतात .सी ए हे एखाद्या संस्थेच्या आर्थिक आरोग्याचे वैद्य असतात , शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो , निसर्गातील चढ उतारांचा नेटाने सामना करीत कष्टाने शिवार फुलवतात , या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने हा स्नेह मेळावा आयोजित केला आहे. याप्रसंगी बँकेच्या विविध योजनाची माहिती याद्वारे देण्यात आली.


बँकेचे चेअरमन श्री सतीश मुळे म्हणाले की डॉक्टर्स , सी ए , शेतकरी यांना जगात अनन्यसाधारण महत्व आहे , आपल्या कार्यकुशल्तेच्या जोरावर आपल्या व्यवसायात स्वताला समर्पण भावनेने सेवा देतात.आपल्यासमोर आरोग्याचे संकट उभा राहिलेवर डॉक्टर देवदूतासारखे धावून येतात, आपल्या तल्लख बुद्धीने , निष्ठेने व प्रामाणिकपणे देशाच्या आर्थिक घडामोडींना दिशा देणारे सी ए असतात , तर शेतकरी हे देशाच्या उन्नतीचे पाया आहेत या सर्वांमुळे आपण सुखाची झोप घेऊ शकत आहे , अशा लोकांना सेवा देण्यास आम्हाला आनंद होईल.


याप्रसंगी बँकेचे कुटुंबप्रमुख श्री प्रशांत परिचारक यांनी डॉक्टर , सी ए , शेतकरी त्यांना शुभेच्छा देत म्हणाले, हे सर्वजण तिन्ही क्षेत्रांमध्ये देशाच्या आर्थिक विकासाचे आधारस्तंभ आहेत , आर्थिक जगतातील शिस्त , पारदर्शकता आणि सचोटी यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सी ए आहेत , सी ए डे हा व्यावायिक पदाचा सन्मान नाही तर पारदर्शकता , प्रामाणिकपणा, बुद्धीमत्तेचा गौरव आहे . आजच्या ताण तणावाने भरलेल्या जीवनात डॉक्टरांचे स्थान केवळ रूग्णालयापुरते मर्यादित नाही तर मानसिक भावनिक आणि सामाजिक आरोग्याचे मार्गदर्शक ठरतात, त्यांची सेवा , समर्पण आणि संवेदनशीलता यामुळे जीवनातील खरे हिरो ठरतात्त . शेतकरी म्हणजे जमीन आणि आभाळ यांच्यामध्ये स्वताच आयुष्य गवसलेला एक परिश्रमी योद्धा आहे ,त्यांच्या अविश्रांत कष्टाच्या जोरावर आपण आपली भूक भागवू शकतो .या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हेतूने या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे . बँकेला ११३ वर्षाची विश्वसनीय परंपरा असून स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहयोगामुळे बँक यशस्वी वाटचाल करीत आहे .


कार्याक्रमचे स्वागत सौ माधुरीताई जोशी यांनी केले . या प्रसंगी आय एम ए च्या अध्यक्षा डॉ. सौ ऋतुजा उत्पात , सी ए शिरीष कोठाडीया, सी ए पवनकुमार झंवर यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे व्यवस्थापक श्री गणेश हरिदास ,निरंजन रुपलग , संदीप पिटके व पंढरपूर बँक कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले . याप्रसंगी शहरातील बहुसंख्य डॉक्टर , सी ए, बँकेचे संचालक श्री शांताराम कुलकर्णी , अनिल अभंगराव , विनायक हरिदास , अनंत कटप, प्रभूलिंग भिंगे, गणेश सिंघण, गजेंद्र माने , हरीश ताठे , व्यंकटेश कौलवार, सी ए अतुल कौलवार उपस्थित होते .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *