पंढरपूर दिनांक :2 जुलै रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन येथे सालाबादप्रमाणे लहानग्यांच्या प्रचंड उत्साहात दिंडी सोहळा संपन्न झाला.

कर्मयोगी विद्यानिकेतन म्हणजे अभ्यासासह संस्कार आणि परंपरा जपत ज्ञानदान करणारी शाळा असे पंढरपूर पंचक्रोशी मध्ये नावारूपास आली आहे.आषाढी वारीच्या औचित्याने आज दिनांक 2 जुलै रोजी अशाच शिस्तबद्ध आणि देखण्या नियोजनाने, सुंदर अशा वेशभूषा करून लहानगे नटून थटून अगदी प्रसन्न मुद्रेने या सोहळ्यात सहभागी झाले होते.मुली विविध पारंपरिक पेहेराव करून दिंडीत सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री व सौ. सोमनाथ काळे, श्री व सौ ऋषिकेश कुलकर्णी, श्री व सौ अटकळे आणि सौ लिंगायत हजर होते,या पालकांच्या हस्ते या दिंडी सोहळ्याचे उद्घाटन झाले.प्राचार्य मॅडम सौ प्रियदर्शिनी सरदेसाई यांचे हस्ते पालखी पूजन व श्री. व सौ. सोमनाथ काळे आणि श्री. व सौ. ऋषिकेश कुलकर्णी आणि सौ लिंगायत यांचे हस्ते आरती करून पांडुरंगाला वंदन केले.

दिंडी सोहळ्याची वाट पाहत उभे असलेल्या महिला पालकांनी पालखी आणि घोड्याचे पूजन केले हे सर्व पाहून विद्यार्थी आणि पालक अगदीच भावुक झाले.
या सोहळ्याच्या कार्यक्रमाला संस्थेचे चीफ ट्रस्टी श्री. रोहन परिचारक यांनी विद्यार्थ्यांना वारीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके यांनी लहानग्यांचे सजलेले चेहरे आणि त्यांचे नटखट खेळ पाहून आनंद व्यक्त केला.

दिंडी सोहळ्यासाठी आदल्या दिवशी पासून सर्व शिक्षकांनी तयारी केली होती. यासाठी सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि हातभार लाभले.
