पंढरपूर: अवैध वाळू उपसा करणाऱ्या १८ होड्या नष्ट…….

पंढरपूर: अवैध वाळू उपसा करणाऱ्या १८ होड्या नष्ट…….

Loading

पंढरपूर: अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलिस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १८ लाकडी होड्या जेसीबी व कटरच्या साह्याने पूर्णपणे नष्ट केल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे.

सोमवारी पंढरपूर शहरानजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये पंढरपूर- इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आठ लाकडी होड्या जेसीबीच्या साह्याने नष्ट करण्यात आल्या. तसेच शिरढोण- इसबावी दरम्यान असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १० लाकडी होड्या कटरच्या साह्याने कट करून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या.

या कारवाईमध्ये मंडल अधिकारी विजय शिवशरण, राजेंद्र वाघमारे, रिगन चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील, प्रमोद खंडागळे, महेशकुमार सावंत, गणेश पिसे, संजय खंडागळे, रविकिरण लोखंडे, पी. पी. कोईगडे, पियुष भोसले, दिगंबर डोईफोडे व पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *