
मोहोळ : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मावळा प्रतिष्ठान आष्टी, ता . मोहोळ यांच्याकडून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
दिनांक २० फेब्रुवारी २०२५:
आष्टी तालुका मोहोळ येथील मावळा प्रतिष्ठानच्या १२६ मावळ्यांनी रक्तदान करून शिवछत्रपतींची जयंती साजरी केली.

या रक्तदान शिबीराचे उद्घाटन लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी केले.
यावेळी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अड सचिन गुंड, उपाध्यक्ष उमेश व्यवहारे, खजिनदार रमेश गुंड, यांच्यासह मदनसिंह पाटील,दिपक (भैय्यासाहेब) सावंत,महेंद्र गुंड,संदीप गुंड,मकरंद पाटील,तेजस गुंड,देवदत्त गुंड,जयसिंह गुंड,प्रमोद गुंड,प्रशांत गुंड,सचिन कदम, कैलास भोसले, तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.
अक्षय ब्लड बँक सोलापुर यांच्या सहाय्याने रक्तदान शिबिरात १२६ तरुणांनी रक्तदान केले.
यावेळी चेअरमन बाळराजे पाटील यांनी मावळा प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या.