👁 2 Views

पुणे – सोलापूर महामार्गावर इंर्टिगा कारची स्कुटीला धडक, ज्येष्ठ नागरिक जखमी

पुणे – सोलापूर महामार्गावर इंर्टिगा कारची स्कुटीला धडक, ज्येष्ठ नागरिक जखमी

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने चाललेल्या इंर्टिगा कारने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर परिसरात रविवारी (ता.9) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या अपघातात जेष्ठ नागरिक जखमी झाला आहे. तर कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरखनाथ गोविंद कळसकर (वय -34, रा. मु.पो. सिध्दटेक ता. कर्जत जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी यन्नतराव सरवदे (वय 71, रा. सव्हे नं.131 शिंदेवस्ती हडपसर पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी सरवदे हे स्कुटी घेऊन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून रविवारी चालले होते. त्यांची स्कुटी एम. आय.टी. कॉर्नर परिसरात आली असता, त्यांच्या दुचाकीला इंर्टिगा कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी सरवदे यांच्या डोक्याला मुक्का मार तसेच उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान, कारचालक गोरखनाथ कळसकर याने त्याच्या ताब्यातील कार, भरधाव वेगाने, हयगयीने, बेदरकारकपणे, वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करुन चालवून फिर्यादी यांच्या मोटार सायकलीस पाठमागुन धडक दिली. व या अपघातास व फिर्यादी यांना जखमी करण्यास कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद शिवाजी सरवदे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गोरखनाथ कळसकर यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्यास संहिता कलम 281, 125 (ब) मोटार वाहन कायदा कलम 184, 119/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *