👁 2 Views

परीक्षा देऊन घरी येताना काळाचा घाला, ऊसाचा ट्रॅक्टर अंगावरून गेला……

परीक्षा देऊन घरी येताना काळाचा घाला, ऊसाचा ट्रॅक्टर अंगावरून गेला……

शिष्यवृत्तीची परिक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्यानं जागीच मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना कोल्हारपुरच्या शाहूवाडी येथील पिशवी पैकी व्हनांगडेवाडी येथे घडली आहे

तरूण शिष्यवृत्तीची परिक्षा देऊन घरी जात असताना हा अपघात घडला. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली. या घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिशवी पैकी व्हनांगडेवाडी ता. शाहूवाडी येथील श्रीधर व्हनांगडेचा अपघाती मृत्यू झाला आहे. श्रीधर हा इयत्ता आठवीत शिकत होता. बांबवडे येथीस महात्मा गांधी विद्यालयात तो शिक्षण घेत होता. १० फेब्रुवारीला त्याची शिष्यवृत्तीची परिक्षा होती. पेपर संपल्यानंतर तो पायी आपल्या मित्रांसोबत घरी जात होता.

दरम्यान, साखर कारखान्याहून ऊस उतरून ट्रॅक्टर रिकामा परतत होता. विद्यार्थ्यांनी हात करून थांबवले रिकाम्या ट्रॅक्टरमध्ये विद्यार्थी चढले. घराजवळ आल्यावर ट्रॅक्टर चालकाला न सांगताच श्रीधरने ट्रॅक्टरमधून उडी मारली. उडी मारल्यानंतर त्याचा तोल गेला. तोल गेल्यामुळे तो ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडला. चाकाखाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

श्रीधरला लगेच बांबवडे येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीधर हा एकुलता एक होता. आई – वडील आणि बहीण असा त्याचा परिवार आहे. ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *