👁 4 Views

वेळापूरात पकडला 43 लाखांचा गुटखा …….

वेळापूरात पकडला 43 लाखांचा गुटखा …….

प्रतिबंधित गुटखा भरलेले आयशर वाहन पंढरपूरकडून पुणे येथे वेळापूर मार्गे जात असताना पालखी चौक वेळापूर सापळा रचून 43 लाखांचा गुटखा, तसेच टेम्पो, मोबाईल असा मिळून 64,61,800 रुपयांचा मुद्देमाल वेळापूर पोलीसांनी पकडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूरकडून पुण्याच्या दिशेष वाहन नंबर (एम.एच. 11 डी.डी. 6527) हे वाहन चालले होते. रात्री 10.30 वा.थांबवून पोलीसांनी चौकशी केली.

तेव्हा टेम्पोच्या पाठीमागील हौद्यामध्ये बारदानीच्या पोत्यामध्ये अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा असल्याचे दिसून आले. 132 बारदानीचे पोते, 10 पुटटयाच्या बॉक्समध्ये विमल पानमसाला, सुगंधित तंबाखू गुटखा असे एकूण 43,43,800 रूपयाचा प्रतिबंधीत गुटखा तसेच 21 लाख रूपयाचा सहा चाकी आयशर वाहन, वाहनाचे केबिनमध्ये 18 हजार रूपये किंमतीचे चार मोबाईल मिळून आले. असे एकूण मिळून 64,61,800 रूपयाचा मुददेमाल मिळून आला. अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी जप्त करून ताब्यात घेतले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *