👁 3 Views

सोलापूर : हफ्ते थकवले , बँकवाल्यांनी गाडीसह मुलाला उचललं , गोडावूनमध्ये डांबलं, तिघे जण ताब्यात

सोलापूर : हफ्ते थकवले , बँकवाल्यांनी गाडीसह मुलाला उचललं , गोडावूनमध्ये डांबलं, तिघे जण ताब्यात

सोलापुरात एका खासगी बँकेचे हफ्ते थकवल्यानं कर्जदाराच्या मुलालाच डांबून घातल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी सोलापुरात तिघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. १ फेब्रुवारीला एका तरुणाचं अपहऱण झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती.

याचा तपास केल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. चार चाकी गाडीवर कर्ज घेतले होते. त्याचे हफ्ते थकवल्यानं वाहनासह कर्जदाराच्या मुलालासुद्धा उचलून नेण्यात आलं. सोलापूरमध्ये जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, १ फेब्रुवारीला जेल रोड पोलीस ठाण्यात एका तरुणाचं अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनीच तरुणाचं अपहरण केल्याचं समोर आलं. चारचाकी वाहनाचे हफ्ते न भरल्यानं गाडीसह मुलाला उचलून नेण्यात आलं. सोलापुरातील या खासगी बँखेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कृत्यामुळे संतापाची लाट उसळलली आहे.

अपहरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केलीय. कर्जदाराच्या मुलाचं अपहरण केल्यानंतर त्याला एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं होतं. अपहरण करणाऱ्यांची नावे शकिल बोंडे, इमरान शेख, देवा जाधव या तिघांवर गुन्हा दाखल केलाय. तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास केला जात आहे.

वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाला गाडीसह उचललं. मुलाला सोडण्यासाठी दहा हजारांची खंडणीही मागितली असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. तसंच अशी वसुली कोणी करत असेल तर कर्जदार, नागरिकांनी संपर्क साधा असं आवाहनही पोलिसांनी केलंय.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *