सोलापूर: रंगभवन चौकातून माणिक चौकाच्या दिशेने जाणाऱ्या कारने (एमएच १२, एचझेड ७४०५) दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील माझी पत्नी पल्लवी दळवी (वय ६९, रा. दत्त नगर, सोलापूर) ही गंभीर जखमी होऊन मयत झाल्याची फिर्याद प्रफुल्ल भालचंद्र दळवी यांनी सदर बझार पोलिसांत दिली.
अपघातानंतर तो कार चालक पळून गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यावरुन कार चालक किरण कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस निरीक्षक सारिका जगताप तपास करीत आहेत.


