सोलापूर: कामती (ता. मोहोळ) येथे वाहनाची (एमएच-४०, एके-८९९३) चौकशी करून तपासणी केल्यानंतर ६६ लाख १६ हजार ६०० रुपयाचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.
त्यामध्ये विमल पानमसाल्याचे २००० बॉक्स, व्हि-१ सुगंधित तंबाखूचे २००० बॉक्स, विमल पानमसाल्याचे २४००० पाकिटे, व्हि-१ सुगंधित तंबाखूचे २४००० पाकिटे व विमल पानमसाल्याचे १८०० पाकिटे असा एकूण ६६ लाख १६ हजार ६०० रुपयाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
वाहन चालक विजय शिवानंद (कंबार, रा. आझाद रोड, आळणावर, धारवाड कर्नाटक), साठा मालक सुजित खिवसारा (रा. पुणे) वाहन ट्रान्सपोर्टर मालक रफिक मेनन, वाहन मालक लक्ष्मी सुनील रहागडाले यांच्या विरुद्ध कामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त सुनील जिंतूरकर, अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर, मंगेश लवटे, उमेश भुसे व नमुना सहायक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने केली आहे.


