सोलापूर: वाखरी ते वेळापूर रोडवरील थोरात पेट्रोल पंपासमोर २६ जानेवारीला रात्री साडेदहा वाजता भरधाव बोलेरो जीपची (एमएच ४५, एएल ५४८९) उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडक बसली.
सागर धनाजी कांबळे (वय २७, रा.लऊळ, ता. माढा) याने भरधाव वेगाने जीप चालवली व त्या अपघातात सौदागर नरहरी लोंढे (वय ५०, रा. मोडनिंब, ता. माढा) हे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी सुधीर रमेश घाडगे (रा. शिरगाव, ता. पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर कांबळेविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. कांबळे हा देखील या अपघातात जखमी झाला असून, पोलिस उपनिरीक्षक राऊत तपास करीत आहेत.


