👁 4 Views

सोलापूर: विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षक जेरबंद…… सोलापूर शहरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकार

सोलापूर: विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षक जेरबंद…… सोलापूर शहरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकार

सोलापूर: शहरातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकानेच तेथील इयत्ता बारावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडितेने सदर बझार पोलिसांत धाव घेत त्या शिक्षकाविरुद्ध फिर्याद दिली असून सदर बझार पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली आहे.

गुन्ह्यातील संशयित आरोपी शिक्षक हा पीडित विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करुन तिला नाहक त्रास देत होता. पीडिताला ‘तू मला आवडतेस’ असे सारखे म्हणून रस्ता अडवत होता. पीडितेची इच्छा नसतानाही तो शिक्षक फिर्यादीचा हात धरून जबरदस्तीने त्याच्यासोबत घेऊन जाऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा व विनयभंग करीत होता.

एवढ्यावरच न थांबता ‘तू मला आवडतेस, तू मला सोडून जाऊ नकोस, नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन’ अशी धमकी देखील त्याने दिल्याचे पीडिताने पोलिसांना सांगितले. किरकोळ कारणावरून तो मानसिक छळ करत होता आणि या गोष्टीला कंटाळून पीडिताने सदर बझार पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी त्या संशयित आरोपी शिक्षकाविरुद्ध बाल लैंगिक शोषणासह भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८ ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी त्याला अटक केली असून उद्या (मंगळवारी) त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून सहायक पोलिस निरीक्षक सारिका जगताप तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *