👁 11 Views

दुदैवी …… चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

दुदैवी …… चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू

चोपडा तालुक्यातील अडावद गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव येणाऱ्या चारचाकीने दिड वर्षाच्या चिमुकलीस जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यु झाला.

याप्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत गल्लीत भरधाव येणाऱ्या महिंद्रा मॅझिमो ( क्रमांक : MH-39-J-7424) या गाडीने दिड वर्षाच्या प्रियांशी संदिप पाटील या चिमुकलीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा संदिप पाटील या त्यांच्या घरासमोर असलेल्या दुकानात ताक घेण्यासाठी जात असताना त्यांच्या मागोमाग प्रियांशी रस्ता ओलांडत होती. याचवेळी ग्रामपंचायतीकडून चांग्यानिम चौकाच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या चारचाकी गाडीने तिला जोरदार धडक दिली. गाडीच्या पुढील व मागील उजव्या बाजूच्या चाकाखाली प्रियांशी आल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेनंतर मयत प्रियांशीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे आरोपी गाडीचालक पंकज अरुण धनगर (रा. कमळगाव, ता. चोपडा ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भरत नाईक करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *