👁 4 Views

पेपर देऊन दुचाकीवरून घरी जाताना काळाचा घाला, डंपरने विद्यार्थ्याला चिरडले

पेपर देऊन दुचाकीवरून घरी जाताना काळाचा घाला, डंपरने विद्यार्थ्याला चिरडले

बारामती: चालकाने बेदरकारपणे हायवा डंपर चालवून दुचाकीस्वार विद्यार्थ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र या अपघातातून बचावला. बारामती शहरातील तांदूळवाडी भागात शुक्रवारी (दि.24) दुपारी हा अपघात घडला. डंपरचालकाच्या बेदरकारपणाला लगाम कधी घातला जाणार? असा प्रश्न या अपघातामुळे पुढे आला आहे.

जुनेद झारी (वय 18) असे या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचा मित्र तुषार भिसे हा या अपघातात सुदैवाने बचावला. जुनेद व त्याचा मित्र तुषार हे दोघे टी. सी. महाविद्यालयातील बारावीचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे.

हे दोघे शुक्रवारी दुपारी महाविद्यालयातून पेपर संपवून घराकडे निघाले होते. रेल्वे गेटजवळील बोगद्यानजीकच्या वळणावर भरधाव हायवा डंपरने त्यांना चिरडले. त्यात दुचाकी चालविणारा जुनेदचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला तुषार थोडक्यात बचावला.

अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज दुचाकीवरून हे दोघे निघालेले असताना अचानक पुढून आलेल्या चालकाने हायवा डंपर वळवला. यात दुचाकीवरील दोघेही जमिनीवर कोसळले. या वेळी डंपरचे पुढील चाक जुनेदच्या अंगावरून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे, तर सोबत असणारा तुषार बचावला आहे. सीसीटीव्हीमधील अपघाताचा थरार अंगावर काटा आणणारा आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *