👁 5 Views

Solapur : सोलापूर जिल्ह्यातील 38 खत दुकानदारांसह कंपनींना नोटिसा

Solapur : सोलापूर जिल्ह्यातील 38 खत दुकानदारांसह कंपनींना नोटिसा

सोलापूर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील 880 खत औषधे दुकानांची तपासणी केली. त्यातील 38 दुकानातील खते, बियाणे आणि किटनाशके अप्रमाणित असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्या दुकानदार आणि संबंधित कंपनीस कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. या दोन्ही विभागाच्यावतीने एका वर्षात जिल्ह्यातील खत औषधांच्या दुकानातील खते, किटकनाशके आणि बियाणांची तपासणी केली. त्यामध्ये आतापर्यंत 38 नमुने अप्रमाणित सापडले आहेत. यामध्ये खातांचे 23, बियाणांचे तीन, किटकनाशकांचे 12 नमुन्यांचा समावेश आहे.

कृषी विभागाने डिसेंबर अखेरपर्यंत खतांचे 205 नुमने घेण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यातील 192 नमुने घेतले आहेत. बि-बियांणांचे 504 नमुने घेण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील 501 पूर्ण झाले आहेत. खतांचे 207 नमुने घेण्याचे निश्चित केले होते. त्यातील 187 नुमने घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. ही तपासणी एप्रिलपर्यंत चालणार आहे. बि-बियाणे, खते आणि किटकनाशकांचे 38 नमुने अप्रमाणित असल्याने संबंधित दुकानदार, कंपनीवर कायदेशीर कार्यवाही सुरु असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. कृषी विभागाने आपल्या कामात सातत्य राखल्यास अशाप्रकारचे धाडस कुणीही करणार नाही.

-हरिदास हावळे, जिल्हा कृषी विकास अधिकारीजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खते औषधांच्या दुकानांची तपासणी सुरु आहे. आतापर्यंत 880 नुमने तपासले आहेत. त्यातील 38 नमुने अप्रमाणित निघाले आहेत. त्या दुकानदार, संबंधित कंपनींस नोटिसा दिल्या आहेत. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *