👁 3 Views

जालना येथील भाविकांकडून श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 71 हजाराची देणगी

जालना येथील भाविकांकडून श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 71 हजाराची देणगी

पंढरपूर (ता.10) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आर्या आदित्य अग्रवाल या भाविकांनी 71 हजार रुपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

त्याबद्दल संबंधित भाविकाचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्री ची प्रतिमा व उपरणे घेऊन यथोचित सन्मान केला. संबंधित भाविक हे जालना येथील रहिवाशी असून, आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयास संपर्क करून सदरची देणगी दिली आहे.

तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन संपूर्णतः निशुल्क आहे. श्रीच्या पदस्पर्श दर्शन अथवा मुखदर्शनासाठी कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती, अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संपर्क करू नये. श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशी अर्चन पूजेसाठी व इतर अनुषंगिक माहितीसाठी मंदिर समितीच्या दूरध्वनीवर, अधिकृत संकेतस्थळ तसेच इंस्टाग्राम पेजला फॉलो करून भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी श्री संत तुकाराम भवन येथील जनसंपर्क कार्यालय व श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथील चौकशी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *