श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या चरणी 6 लक्ष किंमतीचे सोने-चांदीचे दागिने अर्पण,

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या चरणी 6 लक्ष किंमतीचे सोने-चांदीचे दागिने अर्पण,

Loading

पंढरपूर (ता.10) श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस सुमित मोरगे या दानशुर भाविकांकडून 6 लक्ष किंमतीने सोने-चांदी दागिने अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

यामध्ये गोफासह लिंग, बेलपान, मंगळसुत्र, बाजूबंद इत्यादी 81 ग्रॅम वजनाचे सोने वस्तू तसेच 75 ग्रॅम वजनाचे चांदीची करंडे / वेढणे जोड वस्तू दान केली आहे. संबंधित भाविक हे नांदेड येथील रहिवाशी असून, श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत. त्यांनी यापूर्वी मंदिर समितीस श्री विठ्ठल गाभारा व श्री रूक्मिणी गाभारा येथील मेघडंबरीला चांदी लावून दिलेली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *