👁 6 Views

मला शिवसेनेचीही ऑफर – राणे

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 19 september  2017 

फाईल चित्र

आजही मी काँग्रेसमध्येच आहे. मला काँग्रेस पक्षाबाबत काहीच म्हणायचे नाही. माझा विरोध माझे मित्र असलेल्या व पक्षाचे काम नीट न पाहणा-या अशोक चव्हाणांना आहे. मी अजून भाजपात जाण्याचे ठरवलेले नाही. तो ठरेल तेव्हा बघू, पण भविष्यात काय करणार याची माहिती घटस्थापनेच्या दिवशी करू. मला अनेक पक्षांची ऑफर अगदी शिवसेनेचीही पण सेनेत जाणार नाही अशी गोलमाल भूमिका नारायण राणे यांनी मंगळवारी कुडाळमध्ये मांडली.
नारायण राणेंनी कुडाळमध्ये सोमवारी केलेले शक्तीप्रदर्शन दमदार नव्हते, कालिदास कोळंबकरही हजर नव्हते याबाबत छेडले असता राणे म्हणाले, हे शक्तीप्रदर्शन माझे नव्हते किंवा मी आदेश देऊन लोकांना बोलावले नव्हते. कालिदास कोळंबकरांनी कोकणात येण्याचा प्रश्नच नाही. सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षांनी व काही स्थानिक नेत्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याला मी शक्तीप्रदर्शन मानत नाही. मी आजही काँग्रेसमध्येच आहे. माझा वाद पक्षासोबत नाही. अशोक चव्हाण पक्ष वाढीसाठी काहीही काम करत नाहीत त्याला आहे. त्यांना पक्ष संपवायचा आहे. म्हणून मी बोलत आहे.
भाजपमध्ये जाणे थोडे लांबले आहे का? यावर राणे म्हणाले, आज मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. भाजपमध्ये जायचे की नाही यावर अजून ठरवले आहे. एकदा एखादा निर्णय घेण्याचे ठरवल्यानंतर त्याविषयी बोलता येईल. मला भाजपतच काय सर्वच पक्षातून ऑफर आहेत. अगदी शिवसेनेतूनही मला ऑफर आहे. पण मला ज्या मार्गाला जायचेच नाही, अशी भूमिका राणेंनी मांडली.

नारायण राणे भाजपात जावे म्हणून शिवसेनेचे गणपतीला साकडे- विनायक राऊत

 मुंबई- नारायण राणे भाजपात जावे यासाठी आम्ही गणपतीला साकडे घातले आहे. ते भाजपात गेल्यास आमची वाट आणखी सुकर होणार आहे. राणेंची ताकद आता संपली आहे. कालचे त्यांचे शक्तीप्रदर्शन नव्हते तक केविलवाणी दर्शन होते, अशी खरमरीत टीका कोकणातील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणे-पितापुत्रांवर केली आहे. निलेश राणेंनी दिलेले आव्हान आपण 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *