👁 8 Views

अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा इक्बाल कासकरला बहिण हसिना पारकरच्या घरातून अटक.. 8 दिवसांची पोलिस कोठडी

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 19 september  2017 



मुंबई- अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला त्याची बहिण हसिना पारकरच्या घरातून अटक करण्यात आली. इक्बालला अटक झाली तेव्हा तो बिर्याणी खात होता. तसेच तो हसिना पारकरवर निर्मित सिनेमा ‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ पाहात असल्याचे ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

दरम्यान, इक्बालला, खंडणीप्रकरणात बेड्या ठोकल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.


एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी इक्बाल याला सोमवारी रात्री उशीरा अटक केली. इक्बाल कासकरने बिल्डरकडून खंडणी म्हणून 4 फ्लॅटची मागणी केली होती. ही टोळी दाऊद चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. इक्बाला कोर्टात हजर केले असता त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, इक्बाल कासकर याच्यावर दाऊद इब्राहिमच्या नावाखाली खंडणी मागत होता.

– इक्बालच्या विरोधात मुंबई, ठाणे, उल्हासनगर आणि डों‍बिवलीच्या बिल्डर्सनी तक्रार केली होती.– काही दिवसांपूर्वी एका बिल्डरने इक्बालच्या विरोधान ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे तक्रार केली होती.– इक्बालसोबत त्याच्या बहिणीचा दीर इक्बाल पारकर, मोहम्मद हुसैन ख्वाजा शेख (ड्रग डीलर), फर्नांडो असे आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.


रिलिज होण्‍याआधीच पाहाण्यासाठी दिली सिनेमाची सीडी…

– ठाणे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इक्बालला त्याच्या बहिण हसिना पारकर हिच्याकडून अटक करण्यात आले. पकमोडीया स्ट्रीटवरील आपले घरी रिकामे केल्यानंतर इक्बाल अनेक दिवस फॅमिलीसोबत राहात होता. इक्बालसह त्याच्या चार साथिदारांना एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्त्वात ठाणे पोलिसांनी मुंबईतील नागपाडा भागातून उचलले.
– प्रदीप शर्मा आपल्या टीमसह नागपाडा येथील हसीनाचे घर गार्डन हाऊसमध्ये पोहोचले तेव्हा इक्बाल आपल्या कुटुंबियांसोबत हसिना पारकर हिच्या जीवनावर आधारीत सिनेमा ‘हसीना: द क्वीन ऑफ मुंबई’ पाहात होता. तसेच तो कुटुंबीयांसोबत बिर्याणी खात होता.
– सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हसीना: द क्वीन ऑफ मुंबई’चे निर्मात्याची सिनेमा रिलीज होण्याआधी हसीनाच्या फॅमिलीला दाखवण्याची इच्छा होती. मात्र, या वृत्ताला फिल्म स्टाफकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
– पोलिस पोहोचले तेव्हा इक्बालसोबत त्याची पत्नी आणि तीन मुले होते. सोबतच हसीना पारकरचा मुलगा आणि सून आणि मुलगी होती.

22 सप्टेंबरला रिलिज होईल सिनेमा…
– हसीना पारकर हिच्यावर जीवनावर आधारीत सिनेमा ‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ मध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने हसिनाचा रोक केले आहे.
– दाऊदने दुबईला पलायन केल्यानंतर त्याचा बिझनेस, मेव्हणा इब्राहिम पारकर हा पाहात होता. त्याच्या हत्येनंतर नागपाडा येथे ‘गॉडमदर’ या नावाने फेमस हसिना पारकरने दाऊदचा बिझनेस सांभाळला होता.
– सिनेमाचे दिग्दर्शन अपूर्व लखिया यांनी केले असून नाहिद खान हे निर्माता आहेत. सिनेमात श्रद्धासोबतच सिद्धांत कपूर आणि अंकूर भाटिया दिसणार आहे.
– सिनेमा 22 सप्टेंबरला रिलीज होईल.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *