👁 9 Views

नारायण राणेंची अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 21 september  2017 



तुम्ही काय हकालपट्टी करता, मीच पक्ष सोडतो’, असे म्हणत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज (गुरुवारी) घटस्थापनेच्या मुहुर्तावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सोबतच त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला.

संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून दसर्‍याच्या आधी माझी ताकद काय आहे, हेही दाखवून देतो. दसर्‍याच्या आधी पुढील भूमिका स्पष्‍ट करणार असल्याचे राणेंनी म्हटले आहे. शिवसेनेचे 27 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. यावेळी राणेंनी काँग्रेसमधील 12 वर्षांची खदखद व्यक्त केली.


अशोक चव्हाण यांनी मला केवळ अडचणीत आणण्याचे काम केले असे राणेंनी सांगितले. काँग्रेसचे महाराष्ट्रातील दुकान बंद होणार असून महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

दोन वाजता सोनियांना पत्र..अडीच वाजता आमदारकीचा राजीनामा…
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन पाळले नाही, अशी राणेंनी नाराजी यावेळी व्यक्त केली आहे. आता मी काँग्रेसमूक्त झालो असल्याचे ते म्हणाले. दुपारी दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवले आणि 2 वाजून 35 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवल्याचे राणेंनी सांगितले.

माझा उपयोग करून घेता आला नाही…
राणेंनी 26 जुलै 2005 रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु या 12 वर्षांत माझ्या कामाचा, अनुभवाचा पक्षाने फायदा करुन घेतला नाही, अशा शब्दात राणेंनी काँग्रेसवर आसूड ओढले.

पक्षश्रेष्ठी दिल्लीत बोलवायचे पण ते आपल्याला वेळ दिला नाही, खंतही त्यांनी बोलून दाखवली.

महाराष्ट्र दौरा करून पुढील भूमिका स्पष्ट करणार…
– आपल्याकडे अनेक पक्षाचे ऑफर आहेत. परंतु योग्य ठिकाणी योग्य वेळी निर्णय घेऊ, असेही राणे यांनी सांगितले.
– अशोक चव्हाणला दाखवणार तू अध्यक्ष.. माझ्याकडे पद नाही पण कुणाच्या मागे लोक आहेत हे मी दाखवून देणार, अशा शब्दात राणेंनी चव्हाणांना आव्हान दिले.
– नागपूर, औरंगाबाद, नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे.

काँग्रेसला लवकरच कळेल…
– संपूर्ण महाराष्ट्रात लोक काँग्रेस सोडतील. काँग्रेसचे 100 टक्के पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. काँग्रेसच्या 25 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. 
– काँग्रेस-शिवसेनेला रिकाके करणार असल्याचे राणेंनी सांगितले आहे.

– राज्यातून अनेकजण काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत.
– अशोक चव्हाण यांना माझी ताकद दाखवून देईल. चक्रव्युहातून बाहेर कसे पडायचे हे मला चांगले माहीत आहे, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.

शिवसेनेचे 27 आमदार राजीनाम्याच्या तयारीत‍…

काँग्रेस आणि शिवसेनेतील अनेकांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला असल्याचा दावा राणेंनी केला आहे. शिवसेनेचे 27 आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे, ही विद्या मी आत्मसात केली आहे. याच विद्येच्या जोरावर मी शिवसेनेतून बाहेर पडलो होतो. उद्धव ठाकरे यांनीच माझ्याविरोधात षडयंत्र रचले होते. त्यांना माझे यश पाहाता आले नाही. म्हणून मी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.

राणेंचे खंदे समर्थक दत्ता सामंतांचाही राजीनामा…
राणे यांचे खंदे समर्थक दत्ता सामंत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केले. या बेठकीस नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, दत्ता सामंत, जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
  • राणे काय करणार आहेत, हे त्यांच्या जवळच्याही लोकांनाही माहीत नाही. तीन दिवसांपूर्वी त्यांनी स्वतंत्र समर्थ विकास पॅनलची घोषणा करून ग्रामपंचायत निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. आता ते नवे काय सांगणार असल्याने राणे समर्थक गोंधळलेले आहेत. पॅनल काढले असले तरी राणे नवा पक्ष काढण्याची अजिबात शक्यता नाही. भाजपमध्ये जाण्याचे त्यांनी निश्चित केले असून आता आपल्याला काय मिळते, याकडे त्यांचे लक्ष असल्याने ते आज पत्रकार परिषदेत नवीन काहीही सांगता आपल्या नेहमीच्या आवडत्या उद्योगांप्रमाणे काँग्रेस तसेच शिवसेनेवर टीका करण्याचे काम करतील, अशी चर्चा आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *