- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 23 september 2017
हायकोर्टाच्या आदेशाने पंढरपूर सत्र न्यायालयात सुनावणी पुर्ण
पंढरपूर/ प्रतिनिधी सन २०१३ मध्ये राज्यात गाजलेल्या शेगाव दुमाला ता. पंढरपूर येथील पाच वर्षीय संकेत आटकळे खून प्रकरणातील दोन आरोपींचा जामीन पंढरपूरचे सत्र न्या. ए.जी.पाटणंगणकर यांनी शुक्रवारी रद्द केला. यामुळे या प्रकरणातील गणेश आटकळे व महेश आटकळे या आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांची रवानगी कारागृहात केली.

३ सप्टेंबर २०१३ साली शेगाव दुमाला ता. पंढरपूर येथील संकेत आटकळे या पाच वर्षीय बालकाचे अपहरण करून खून करण्यात आंला होता. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण त्यावेळी राज्यभर गाजले होते. तालुका पोलीसांनी सुमारे महिन्याभरानंतर सात आरोपींना अटक केली होती. यांनंतर नऊ महिन्यांनी या संशयित आरोपीना गावामध्ये प्रवेश करायचा नाही या अटीवर तत्कालीन न्यायाधिशांनी जामीन मंजूर केला होता. पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश स्मिता कयू यांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीनावर मुक्त केले होते. मात्र या आरोपींना जामीन देताना सविस्तर कारणेमिमांसा असणारे निकालपत्र न देता आरोपींची जामीनावर मुक्तता केली होती. या गंभीर प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतहून दखल घेत हि सर्व प्रकरणांची सुनावणी घेतली. तत्कालिन निलंबित न्या. स्मिता कयू यांच्या कार्यकाळात कारणेमिमांसा नसणारे सिव्हील व क्रिमीनल केसेसची संख्या मोठ्या प्रमाणात असून हे गंभीर प्रकरण त्यावेळी हायकोर्टाच्या निदर्शनास आले. यामुळे हायकोर्टाच्या आदेशानुसार सोलापुरचे जिल्हा सत्र न्यायाधिश यांनी ताबयतोब स्मिता कयू यांच्याकयून पंढरपूर सत्र न्यायालयाचा पदभार काढून त्यांना कार्यमुक्त केले होेते. यानंतर निलंबित न्यायाधिश स्मिता कयू यांनी त्यांच्या कार्यकाळात जामीन व निकाल दिलेल्या सर्व प्रकरणांची ङ्खाईली सिलबंद करून हायकोर्टाने मागवुून घेतल्या होत्या. यामध्ये संकेत आटकळे खून प्रकरणातील संशयित आरोपी गणेश आटकळे व महेश आटकळे यांना दिलेल्या जामीन अर्जाचा देखील समावेश होता. या गंभीर प्रकरणातील आरोपींना पंढरपूरच्या सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देत जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने १३ जुलै रोजी दिले होते. यानुसार या प्रकरणाची पंढरपूरचे सत्र न्या. ए.जी.पाटनंगणकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारतर्ङ्खे अॅय सारंग वागंीकर, अॅय विजयकुमार नागटिळक यांनी काम पाहिले. तर आंरोपीतर्ङ्खे अॅय मिलींद थोबये यांनी काम पाहिले. यावेळी सरकारतर्ङ्खे आरोपींचा जामीन अर्ज अगोदर नामंजूर केला असल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणे आवश्यक होते. मात्र कोणतेही कायदेशीर परिस्थिती बदलली नसताना व पहिला जामीन अर्ज नामंजूर केला असताना देखील दुसºयांना पंढरपूरच्या सत्र न्यांयालयात जामीन अर्ज दाखल केला. हा जामीन मंजूर केला मात्र सविस्तर कारणेमिमांसा देण्यात आले नाही. यामुळे जामीन अर्ज नामंजूर करण्याचा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने गणेश आटकळे व महेश आटकळे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला.
चौकट
अंतरिम अर्ज देखील न्यायालयाने ङ्खेटाळला
शुक्रवारी दुपारी गणेश आटकळे व महेश आटकळे या आरोपींचा जामीन न्यायालयाने रद्द केल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर आरोपीच्या वतीने अॅय किशोर धारूरकर यांनी मुंबई हायकोर्टात दाद मागण्यासाठी या निकालाच्या विरोधात दाद मागत अंतरिम अर्ज दाखल केला. मात्र सरकारतर्ङ्खे अॅय सारंग वांगीकर यांनी या अर्जाला विरोध करीत कायद्यामध्ये अशी कोणतेही तरतुद नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शिक्षेविरोधात स्थगिती मिळवता येते मात्र जामीन रद्द केल्यानंतर स्थगिती मिळवता येत नसल्याचे अॅय सारंग वांगीकर यांंनी युक्तिवाद केल्याने हा अंतरिम अर्ज देखील न्या. ए.जी.पाटनगणकर यांनी नामजंूर केला.
जामीनासाठी पंढरपूरच्या न्यायालयात आरोपींचा खटाटोप
संकेत आटकळे खून प्रकरणात पोलीसांनी तपास करीत सात आरोपींना अटक केली होती. यानंतर या सात आरोपींनी एकत्रितपणे जामीन अर्ज दाखल केला होता मात्र हा अर्ज ९ यिसेंबर २०१३ रोजी परत घेतला. यानंतर गणेश आटकळे व महेश आटकळे यांनी ३१ यिसेंबर रोजी पुन्हा नव्याने जामीन अर्ज दाखल केला. हा जामीन अर्ज ११ ङ्खेब्रुवारी २०१४ रोजी न्यायालयाने ङ्खेटाळून लावला. यानंतर या संशयित आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणे आवश्यक होते. मात्र त्यांंनी पुन्हा पंढरपूरच्या सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करीत जामीन मिळवला. एकंदरीत प्रकरण पाहिले तर जामीन मिळवण्यासाठी या संशयित आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात न जाता पंढरपूरच्या सत्र न्यायालयात खटाटोप केला. मात्र कारणेमिमांसा नसल्यामुळे याची गंभीर दखल हायकोर्टाने घेत या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी घेण्याचा आदेश दिला. यानुसार सुनावणी पुर्ण होत न्या. पाटनगणकर यांनी या दोन आरोपींचा जामीन रद्द केल्याने एकच खळबळ उयाली आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे