👁 9 Views

आधार कार्डासाठी जनतेची अडवणूक..!

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 23 september  2017 

आदिम विकास परिषदेची कारवाईची मागणी
नविन आधार कार्ड काढून देण्यासाठी तसेच दोष दुरुस्तीसाठी पंढरपूर शहरात सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक होत असून नागरिकांना शंभर रुपयापासून अडिचशे रुपयांपर्यंत रकेमची मागणी केली जात आहे.सामान्य अशिक्षीत लोक हे या आधार कार्ड सेंटर चालकांसाठी मोठे गिर्‍हाईक बनले असून याबात त्वरीत कारवाई करून सामान्य नागरिकांची लूट थांबवावी अशी मागणी आदिम विकास परिषदेच्या वतीने तहसिलदार मधूसुधन बर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे व याबाबत वेळीच कारवाई न झाल्यास आपण धरणे आंदोलन करू असा इशारा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश अधटराव यांनी दिला आहे.
         खासगी केंद्रावर आधार नोंदणीचे मशीन असून, तेथे आधार नोंदणी केली जाते. या केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असल्याने आधार नोंदणी वेळेत होत नाही. शिवाय आधार नोंदणीसाठी नागरिकांची अडवणूक केली जात आहे.सरकारकडून महा ई सेवा केंद्राने आधार नोंदणीचे मशीन देण्यात आले आहेत. तर युआयडीकडून आधार नोंदणीसाठी खासगी संस्थांकडे मशीन देण्यात आल्या आहे. महा ई सेवा केंद्राकडे असलेल्या आधार नोंदणीचे स्वॉफ्टवेअर गेल्या मे महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. एकीकडे शाळेतील मुलांच्या योजना, सरकारी योजना, पॅनकार्ड, बँक अकाउंटला आधार क्रमांक जोडण्याचे बंधनकारक करण्यात आले त्यामुळे अनेक  बालके, शाळकरी मुले हे आधार नोंदणीपासून वंचित आहेत.आधार नोंदणीसाठी खासगी संस्थांकडे असलेल्या आधार मशीनवर नोंदणी करण्यासाठी नागरिकांना जावे लागत आहे. त्या ठिकाणी नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
       याचाच गैरफायदा सद्या काही आधार नोंदणी केंद्र चालकाकडून उठविला जात असून आधार नोंदणी अथवा दुरुस्ती साठी शंभर ते अडीचशे रुपये मागणी केली जात आहे.व याबाबत जाब विचारल्यास अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.खासगी संस्थेकडे असलेल्या आधार नोंदणीच्या मशीनबाबात प्रशासनाचे कोणतीही नियंत्रण न नसल्याने त्यातून गैरप्रकर होत आहेत . हे निवेदन देताना सुरज जगदाळे,शुभम कुंभार,मनिष वानखेडे ,तात्या कांबळे,नितिन पानकर धिरज परचंडराव,नागेश जवंजाळ,मनिष परचंडे,अजित ननवरे,सुनिल हिरणवाळे,विलीन परचंडराव,विजय सुरवसे आदी उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *