- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर-‘‘ग्रामीण भागात विकास करायचे असेल तर तुम्हाला काय पाहिजे ? यापेक्षा शेतात उन्हातान्हात काबाड कष्ट करणार्या शेतकर्याला नेमके कशाची गरज आहे? हे प्रथम जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर त्यावर उपाय करून नवीन योजणा राबवले तर ग्रामीण भागातून विशेषतः शेतकऱ्यांमधून भरगोस प्रतिसाद मिळतो.आपल्या देशातील शास्त्रज्ञ आणि इंजिजिनिअर्स हे परदेशातील शास्त्रज्ञांनी सोडविलेल्या प्रश्नाना धारीनच संशोधन करतात. परंतु सडक, बिजले आणि पाणी हेच आपले खरे प्रश्न आहेत आणि ते सोडविण्यावर आपण भर दिला पाहिजे. एकूणच आपल्या नवनिर्मिती संशोधनाने त्या शेतकर्याचे समाधान होणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शेतकरी अथवा ग्रामीण भागातील विकास करायचा असेल तर तेथील ग्रामपंचायत, तालुका कार्यालय, जिल्हा कार्यालातून आकडेवारी उपलब्ध होऊ शकते.’ असे प्रतिपादन ‘उन्नत महाराष्ट्र अभियान’च्या सल्लागार समितीचे चेअरमन व आय.आय.टी, मुंबईचे प्राद्यापक डॉ. मिलिंद सोहनी यांनी व्यक्त केले.


येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आज ‘रोल ऑफ इंजींनियर्स इन सोसायटल डेव्हलपमेंट’या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उन्नत महाराष्ट्र अभियानच्या सल्लागार समितीचे चेअरमन व आय.आय.टी, मुंबईचे प्राद्यापक डॉ. सोहनी हे प्राद्यापकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. दीपप्रज्वलनानंतर अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी अशी कार्यशाळा का घ्यायची ? यावर विवेचन केले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून‘महाविद्यालयामध्ये अशा प्रकल्पांमध्ये पुर्णत्वे सहभाग नोंदवून समाजोपयोगी कार्यात स्वेरी नेहमीच अग्रेसर आहे.’ असे सांगितले. पुढे बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. सोहनी म्हणाले की, ‘आय आय टी मुंबई पेक्षा येथील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथील शिस्तीमुळे पालक वर्ग निश्चिंत असतात शिक्षणाबरोबरच प्लेसमेंट व वार्षिक निकाल देखील लक्षवेधी आहे. उत्तीर्ण झाल्यानतर विद्यार्थी नोकरी शोधार्थबाहेरच्या जगात जातो यावेळी त्याने मला नोकरी मिळविण्यापेक्षा इतरांनादेखील रोजगार उत्पन्न झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावे.समाजाला आपल्या इंजिनिअरींगच्या ज्ञानाचा वापर करायचा असल्यास तुम्ही शिकत असलेल्या इंजिनिअरिंगच्या एका विभागात अडकुन चालणार नाही तर, आपणास इंजिनिअरिंगच्या विविध शाखांची थोड्या अधिक प्रमाणात माहिती असणे देखील गरजेचे आहे. तसेच तुम्हाला येत असलेल्या उत्तरावर आधारित समाजाचे प्रश्न तयार करून समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. तर समाजामध्ये उतरून त्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून उपलब्ध झालेल्या माहितीवरून समाजाला कशाची गरज काय आहे ? हे समजून घेणे तसेच ते सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना या शास्त्रशुद्ध माहितीद्वारे मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी काही उदाहरणातून दाखवून दिले. बऱ्याचदा प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच हेतू वाईट नसतो परंतु शास्त्रशुद्ध माहितीच्या अभावामुळे शासनाचा निधी जिथे गरज आहे तिथे न पोचता जिथे गरज नाही तिथे पोहचण्याची शक्यता असते. त्याबद्धलचे उदाहरण देताना त्यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील टँकरग्रस्त नकाशांची आखणी केली असता त्यात बरीच तफावत आढळून आल्याचे तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारचे शास्त्रशुद्ध पद्धतीचा समाजाशी निगडीत असणारी माहिती गोळा करून समाजाच्या खऱ्या गरजा आणि समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे काम इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी करू शकतात. जेणे करून या माहितीच्या आधारे एखाद्या योजनेचा खरा वापर होतो की नाही किंवा ती योजना त्या भागासाठी खरीच उपयुक्त ठरलेली आहे किंवा नाही ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आणून देवू शकतो. तसेच या योजना त्रयस्त पद्धतीने आपण मांडून प्रशासनावर दबाव आणून समान करण्याचे कार्य करू शकतो. बऱ्याचदा एखादी समस्या ही फक्त तांत्रिक किंवा सामाजिक नसून इतर काही बाबीही या समस्येवर परिणाम करत आणण्यात आली जर अशा गोष्टींचा शास्त्रोक्त अभ्यास केला नाही तर या समस्यांची गंभीरता ही जो पर्यंत मोठा अपघात होत नाही तोपर्यंत प्रशासनाच्या लक्षात येत नाही. ही बाब त्यांनी नुकताच झालेल्या एल्फिन्सटन ब्रीजच्या अपघाताचे उदाहरण देवून पटवून दिले व त्यांची सामाजिक भागीदारींची जाणीव करून दिली. याकरिता महाराष्ट्र शासनाने उन्नत महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्यातील १२ अभियांत्रिकी महाविध्यालायाना अशा प्रकारचे शास्त्र शुद्ध पद्धतीचे प्रशिक्षण आय.आय.टी मुंबईच्या ग्रामीण विकास केंद्रामार्फत देण्याचे ठरविले आहे. आपले महाविध्यालय हे १२ महाविद्यालायांपैकी एक आहे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घवएवून इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा वापर समाजाच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी पुढाकार घ्यावा आसे आवाहन ही त्यांनी केले.’ यानंतर त्यांनी आर. एन.डी व आर.एच.आर.एफ.डी या संशोधन विभागांना भेट देवून होत असलेले संशोधन व याची माहिती जाणून घेतली.यावेळी इलेक्ट्रोनिक्स अँड टेलिकॉमिनीकेशन इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ.एन.एस.विभूते, सिव्हील इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ. एन.व्ही.खडके यांच्यासह अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी पस्थित होते. अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
छायाचित्र- ‘रोल ऑफ इंजींनियर्स इन सोसायटल डेव्हलपमेंट’या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेच्या प्रसंगी पाहुणे उन्नत महाराष्ट्र अभियान’च्या सल्लागार समितीचे चेअरमन व आय.आय.टी,मुंबईचे प्राद्यापक डॉ. मिलिंद सोहनी यांचे स्वागत व सत्कार करताना संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सोबत डावीकडून अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, सिव्हील इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ. एन.व्ही.खडके
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
