*सुमारे 6 लाख 84 हजाराचे गुळमिश्रीत रसायन व हातभट्टी दारू केली नष्ट*
–
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये सोलापूर तालूका पोलीस स्टेशन हद्दीतील बक्षीहिप्परगा येथील निकम वस्ती व पांढरे वस्ती येथे विशेष टिमने छापा टाकून हातभट्टी दारू तयार होणा-या 4 भट्टयांवर मिळून आलेले 153 बँरल मधील 30,600 लिटर 6,12,000 रू किमतीचे हातभट्टी दारू साठी लागणारे तयार रसायन व 29 ट्युबा त्यात 1450 लिटर हातभट्टी दारू 72,500 रू किमतीची मिळून आलेने ते वाहतुकीस गैरसोईचे असल्याने जागीच नष्ट केले आहे. असा एकूण 6,84,500 रू किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने फरार आरोपी 1) भगवान उर्फ तात्या देवीदास निकम, 2) मुरलीधर उर्फ पप्पू लक्ष्मण पवार दोघे रा निकम वस्ती, बक्षिहिप्परगा ता दक्षिण सोलापूर, 3) संतोष श्रीमंत सलगर, 4) सतीश श्रीमंत सलगर, 5) शिवाजी सोपान निकम तिघे रा पांढरे वस्ती, बक्षिहिप्परगा ता दक्षिण सोलापूर या सर्व 5 आरोपीं विरूद्ध सोलापूर तालूका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील स.पो.नि संदिप धांडे, पो.हे.काँ मनोहर माने, अंकुश मोरे, पो.ना अमृत खेडकर, पो.कॉ अनुप दळवी, सागर ढोरे पाटील, बाळराजे घाडगे, अमोल जाधव, सचिन कांबळे, सिध्दाराम स्वामी, अमोल माने, सोमनाथ बोराटे, विलास पारधी, श्रीकांत जवळगे, पांडूरंग केंद्रे, अक्षय दळवी, महादेव लोंढे व आर.सी.पी प्लाटून नं 3 यांच्या टिमनेे काम केले आहे.*
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




