👁 9 Views

पोलीस अधीक्षक विरेश प्रभुंच्या विशेष टीमचा पंढरपूर शहर येथे जुगार अड्ड्यावर छापा! 10,71,368 /-रू मुद्देमालासह 14 आरोपी ताब्यात

पोलीस अधीक्षक विरेश प्रभुंच्या विशेष  टीमचा  पंढरपूर शहर  येथे जुगार  अड्ड्यावर छापा!
 10,71,368 /-रू  मुद्देमालासह 14 आरोपी ताब्यात

पंढरपूर Live 13 NOVEMBER 2017
   सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी   पंढरपुर शहर पोलीस ठाणे  हद्दीत  पेट्रोलिंग करीत असताना दि 
12-11-2017 रोजी संध्याकाळी  16-00 वा चे सुमारास पंढरीतील जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष टीमने छापा टाकला. यावेळी सुमारे 10 लाखाच्या मुद्देमालासह 14 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

जुना कासेगाव रोड विवेक वर्धिनी शाळेजवळील संतोष लक्ष्मण कवठे याच्या राहते घरातील मन्ना नावाच्या  जुगार अड्यावर छापा टाकून 1) दत्तात्रय ज्ञानेश्वर  माने वय 54 वर्षे रा.जुनीपेठ  2) रावसाहेब बाबासाहेब मोरे  वय 28 वर्षे  रा.मुंडेवाडी  3) संतोष पांडुरंग कुलकर्णी वय  42 वर्षे ,  रा.भक्तीमार्ग   4) नेमीचंद करमदास राका वय 62 वर्षे रा. जुनीपेठ   5) सचिन ज्ञानदेव कदम वय 38 वर्षे  रा. घोगडेगल्ली   6) शहाद अहमद इलाही पठाण वय 36 रा.संतपेठ 7) विठ्ठल उर्फ पांडू भिमराव अंकुशराव वय 30 वर्षे रा.घोगडेगल्ली 8) नरेश उत्तमराव आधटराव वय 27 वर्षे रा.इसबावी 9) अरूण बळीराम नागणे वय 51 रा. सिध्देवाडी 10) स्वप्निल प्रकाश टमटम वय 22 वर्षे  रा. जुनीपेठ 11) दत्तात्रय मधुकर घाडगे वय 32 वर्षे रा. मुंडेवाडी 12) औदुंबर महादेव सुरवसे वय 46 वर्षे रा. संतपेठ 13) हनुमानदास रामविलास भट्टड वय 52 वर्षे रा. वांगीकर नगर 14) विशाल दत्ता खिलाटे वय 22 वर्षे  रा. इसुनारायण झोपडपट्टी सर्व . पंढरपूर वरील आरोपींना मन्ना नावाचा  जुगार कोणाकडे खेळत आहे याची विचारपुस केली असता त्याचे नाव 15) संतोष लक्ष्मण कवठे रा. पंढरपूर असे सांगितले. वरील  इसमांना  जुगार खेळतअसताना  पकडून त्यांना  ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 10,71,368/- रू किमतीचा रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   वरील सर्व आरोपी  याचेविरूद्ध पंढरपूर शहर   पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पोसई जी एच निंबाळकर सर , पो.कॉ, श्रीकांत  जवळगे,   सिध्दाराम स्वामी,विलास  पारधी, अक्षय दळवी पोकाॅ पांडुरंग केंद्रे  , अमोल माने ,यांच्या  टिमने हे काम केले आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *