मरवडेत प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांचा सत्कार
पंढरपूर- मरवडे (ता. मंगळवेढा) येथील शिवशंभू परिवाराच्यावतीने पंढरपूर मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचा सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटवर बिनविरोध निवड झाली त्याबद्धल मरवडेचे उद्योजक सतीश शिंदे यांच्या हस्ते डॉ. रोंगे सरांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी शिवशंभू परिवाराचे संस्थापक निखील कुलकर्णी यांनी प्रास्तविकात सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांच्या महाराष्ट्रात नावलौकिक होत असलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील भरीव अशा कामगीरीवर प्रकाश टाकून प्राचार्य डॉ. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीतील शिक्षकांकडून दिल्या जाणाऱ्या संस्कारात्मक शिक्षणातून विद्यार्थ्यांना मिळणारी यशोगाथा ऐकविली. यावेळी उद्योजक सतीश शिंदे म्हणाले की, ‘आपल्या भागातील मुले १० वी व बारावी नंतर सोलापूर अथवा पुणे मुंबईला उच्चतंत्र शिक्षण घेण्यासाठी पाठवित होतो परंतु आता स्वेरीमुळे आमच्या मुला-मुलींना दूर पाठवावे लागत नाही. त्यात आणखी एक फायदा असा होतो की. मुलांची जास्त चिंता नसते पण परंतु मुलींच्या सुरक्षिततेविषयी आम्हा पालकांना चिंता असायची त्यासाठी आमच्या भागातील काही मुली हुशार असूनही केवळ सुरक्षा व सोय नसल्यामुळे अक्षरशः शिक्षण अर्धवट अवस्थेत थांबवावे लागले. पण आता स्वेरीमुळे तालुकाच नाही, जिल्हाच नाही तर राज्यातील मुलींचे पालक निश्चिंत आहेत. पालकांना पाहिजे अशी सोय त्याठिकाणी होत आहे.’ यानंतर काहींनी स्वेरीच्या शिक्षणातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झालेला फायदा सांगितला. सत्काराला उत्तर देताना संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले, ‘विद्यार्थी केंद्र बिंदू ठेवून विद्यापीठ व संलग्नित संस्था यांच्या विकासासाठी नेहमीप्रमाणेच तळमळीने काम करीन तसेच मरवडेकरांनी माझ्यावर व माझ्या शिक्षण संस्थेवर पहिल्यापासूनच प्रेम केले आहे आता या सत्कारामुळे माझ्या कार्यातील जबाबदारी आणखी वाढली असून या सत्कारामुळे आणखी जोमाने कार्य कारणासाठी एक प्रकारे उर्जा मिळाली आहे. भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्चपदस्त होण्यासाठी माझा प्रयत्न राहील.’ यावेळी नारायण कोळी, संतोष पवार, शिवसेना शाखाप्रमुख आण्णा गणपाटील, पांडुरंग मासाळ, बापू शिंदे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपकक्षप्रमुख विजय कलुबर्मे, ग्राहक संरक्षण कक्षाचे मंगळवेढा तालुका प्रमुख नारायण गोवे, मारुती घुले, बंडू गायकवाड, दत्ता गणपाटील, नानासाहेब जाधव, सुरज घुले, किसन सपकाळ, उमेश मासाळ, गणेश शिंदे, लाहेप्पा पुजारी, अंबादास साळुंखे, आनंदराव जाधव, आकाश मासाळ, नितीन गायकवाड, अजय घुले, आदी नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश घुले यांनी केले तर आभार तेजस गणपाटील यांनी मानले.
छायाचित्र- मरवडे येथील शिवशंभू परिवाराच्यावतीने पंढरपूर मधील स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचा सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटवर बिनविरोध निवड झाल्याबद्धल उद्योजक सतीश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करताना सोबत निखील कुलकर्णी, उपकक्षप्रमुख विजय कलुबर्मे, ग्राहक संरक्षण कक्षाचे मंगळवेढा तालुका प्रमुख नारायण गोवे, मारुती घुले, बंडू गायकवाड, दत्ता गणपाटील व इतर
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





