मंगळवेढा /प्रतिनिधी
नंदेश्वर येथील स्व.बाळासाहेब बंडगर यांच्या पुण्यतिथी निमित्त बाळासाहेब बंडगर कला व क्रिडा मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारांना विविध पुरस्कार आ.भारत भालके यांचे हस्ते देण्यात आले.
यामध्ये स्व.राहुल भाकरे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट युवा पत्रकार समाधान फुगारे,छत्रपती परिवाराचे अध्यक्ष सुरेश पवार,खुपसंगीचे सामाजिक मंडळाचे अध्यक्ष बापु टकले,रासपचे युवक जिल्हाध्यक्ष बापुसाहेब मेटकरी यांना उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता,उत्कृष्ट अॅकॅडमी प्रमुख श्रीकांत पवार,उत्कृष्ट कृषी जयसिंग कांबळे,आदर्श पोलिस कर्मचारी समाधान कळकुंबे,उत्कृष्ट खेळाडू श्रद्धा भारत हाके,आदर्श शिक्षक किसन डांगे, आदर्श शिक्षिका सौ. लंगौटे यांना सन्मानीत करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण आमदार भारत भालके यांच्या शुभहस्ते करण्यातआले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अमोल पांढरे हे उपस्थित होते.या पुरस्कारांचे वितरण १५ नोव्हेंबर रोजी सायं ६वा. करण्यात आले.
यावेळी भिवा दोलतडे, रासपचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, दादासाहेब दोलतडे,कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडु करे, सरपंच बसवराज पाटील,गुलाब थोरबोले,राजाभाऊ निकम,ज्ञानेश्वर मेटकरी,पत्रकार संतोष मोरे,पत्रकार ज्ञानेश्वर भगरे,अँड.रविकिरण कोळेकर,बाळकृष्ण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरूलिंग दोलतडे,आप्पासाहेब मेटकरी, मुन्ना राठी,बापुसाहेब बंडगर,दत्ता कळकुंबे,बलभिम कांबळे उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





