पंढरपूर Live 26 NOVEMBER 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंढरपूरमध्ये विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात आला. दि.26 नोव्हेंबर रोजी संविधान दिना निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून संविधानाचे वाचन केले.
तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पंढरपूर शहर अध्यक्ष संतोष पवार यांच्या वतीने संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला भेट देण्यात आली. यावेळी पो.निरिक्षक दबडे साहेब, पो.निरिक्षक बुवा, उप.निरिक्षक चव्हाण, उपनिरीक्षक अधटराव, रिपाई जि.सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, शहर सरचिटणीस समाधान लोखंडे व रिपाईचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






