👁 7 Views

‘एआरटीओ’त पुन्हा चोरी; बीडमध्ये खळबळ.. अधिकारी संशयाच्या भोव-यात!

‘एआरटीओ’त पुन्हा चोरी; बीडमध्ये खळबळ..
अधिकारी संशयाच्या भोव-यात!



पंढरपूर Live 27 NOVEMBER 2017

निलेश चाळक (बीड प्रतिनीधी)- येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) पुन्हा एकदा शनिवारी चोरी झाली . सीसी टीव्हीसह संगणक, महत्त्वाचे दस्तऐवज आदी मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. वारंवार चो-या होत असल्याने अन् गैरप्रकारांना कार्यालयात निर्बंध नसल्याने अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे येथील अधिकारी संशयाच्या भोव-यात सापडले आहेत.
नेहमीच वादग्रस्त असणा-या या ‘एआरटीओ’ कार्यालयात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी कार्यालयास दुपारी सुटी होती. सर्व अधिकारी, कर्मचारी घरी गेले. हीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री कार्यालयात धुमाकूळ घातला. संगणकाची तोडफोड करीत महत्त्वाचे दस्तऐवज फाडून टाकले. तसेच चोरी करुन बाहेर पडताना या चोरट्यांनी सीसी टीव्ही कॅमेरे फोडले, तसेच ज्या ठिकाणी हा डाटा संकलित होतो, ते यंत्रही तोडले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा चोरीचा उद्देश नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे; परंतु महत्त्वाचे दस्तऐवज फाडून टाकत सीसी टीव्ही फोडल्यामुळे हे काम कुणी तरी जवळच्या व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू आहे. यापूर्वीच्या गुन्ह्यांचाही तपास लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
फिर्याद देण्यास उशीर
घटनास्थळी जाऊन बीड ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला. काही पुरावेही हस्तगत केले. या चोरीची फिर्याद देण्यासाठी ‘एआरटीओ’ कार्यालयातील कुणी तरी पुढे येईल, अशी पोलिसांना अपेक्षा होती; परंतु तसे झाले नाही. दुपारनंतर वरिष्ठ लिपिक ताहेर मोहंमद खलील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्याद देण्यास उशीर केल्याने संशय व्यक्त होत आहे.
कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर
येथील आरटीओ कार्यालयात ‘निकम्मे’ अधिकारी असल्यामुळे सर्व कारभार दलालच पाहतात. कार्यालयात येऊन महत्त्वाचे दस्तऐवज हाताळण्याची त्यांना भीती वाटत नाही. हा सर्व प्रकार अधिकाºयांच्या अर्थपूर्ण सहकार्याने होत असल्याचा आरोप केला जात आहे. रविवारी झालेल्या चोरीने याला पुष्टी दुजोरा मिळाला.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *