या कार्यक्रमाचे उदघाटन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते होणार असून संपूर्ण दिवसभर औषधं व फार्मसी या संदर्भात सोलापूरचे सह आयुक्त (औषधे) वि.द.सुलोचने व औषध निरीक्षक रो.शं. राठोड यांच्याकडून बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सोलापूर ड्रगीस्ट अँण्ड केमिस्ट असोशिएशनचे सर्व पदाधिकारी व औषध विक्रेते उपस्थीत राहणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बसवराज मनुरे, संघटनेचे सचिव राजशेखर बारोळे व खजिनदार राजेश विरपे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी मोबा. नं. ९६८९६६००६५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




