👁 8 Views

ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजते आहे- डॉ. द.ता.भोसले

रांझणी येथे राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण संपन्न



पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017

पंढरपूर प्रतिनिधी    
            ग्रामीण भागामध्ये साहित्य चळवळ चांगलीच जोर धरते आहे. ग्रामीण भागातले बरेच हात सकस साहित्य निर्मिती करत आहेत. ते आपल्या लेखणीतून मातीचं दुखणं मांडत आहेत. साहित्य हे समाजाचा आरसा असतो. रांझणी सारख्या एका छोट्या गावात साहित्याचा जागर होणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन येथील जेष्ठ ग्रामीण साहित्यिक व समीक्षक डॉ. द.ता.भोसले यांनी केले. औचित्य होते रांझनी येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सार्वजनिक वाचनालय व श्री जयभवानी भक्तगण व सांस्कृतिक कालामंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरणाचे.
       या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले की, तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असताना, त्यांना पुन्हा वाचनाकडे वळविणे हे आपल्या सर्वांपुढचे खूप मोठे आव्हान आहे. पण जर असे साहित्यिक कार्यक्रम गावोगावी होत राहिले तर तरुण पिढी नक्की वाचनाकडे वळली जाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते व माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे होते, ते बोलताना म्हणाले की सुरेश शिंदे , प्रवीण भाकरे व त्यांचे सहकारी वाचनालयाच्या माध्यमातून हे जे उपक्रम घेत आहेत, ते उल्लेखनीय आहेत. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत.
     यावेळी दिनकरराव मोरे,वसंतनाना देशमुख,हरिषदादा गायकवाड, पंडित भोसले, कल्याणराव शिंदे, सौ.वर्षांराणी घोडके, यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी डॉ.राजाराम राठोड, संभाजी आडगळे, श्रीकृष्ण जगदाळे, सौ.शिल्पा सावंत, सौ.मीनल येवले, सौ.सुनीता काटम या पुरस्कार प्राप्तीना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
      यावेळी अरुण कटारे ,सुनील जवंजाळ, सौ.मयुरी जाधव, हरिश्चंद्र पाटील, अविनाश सुर्वे व गणेश गायकवाड यांचे बहारदार कविसंमेलन झाले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरस्कार समितीचे अध्यक्ष व संयोजक भैया भाकरे यांनी केले, सूत्रसंचालन साहीत्यीक अंकुश गाजरे यांनी केले तर आभार संतोष राजोपाध्ये यांनी मानले. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील साहित्यरसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ घाडगे, दादा म्हमाणे, विलास शिंदे, दत्ता घाडगे, धनाजी चौगुले, विलास दांडगे यांनी कष्ट घेतले.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *