👁 7 Views

राष्ट्रवादीचे बीड मध्ये हल्लाबोल आंदोलन..!

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी
पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017

निलेश चाळक बीड : आता पर्यंत हे सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचे ढोंग करत आले आहे. फसव्या कर्जमाफीमुळे अनेक शेतकरी नाराज आहेत. शासनाने कर्जबाजारी शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी करत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन केले. यामध्ये चºहाटा फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटारसायकल रॅली काढली. 

यावेळी राकॉचे जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर, तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, राकाँ जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, सरचिटणीस दिलीप भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. याचे पंचनामे करून  शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी शिवाय सद्यस्थितीत  शेतकऱ्यांना विज पुरेशी मिळत नाही. अनेकवेळा विजे अभावी शेतकºयांची पिके जळून जातात. सध्या पाणी आहे मात्र विज नसल्याने शेतक्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे सरकारने  शेतकऱ्यांना वेळेवर विज पुरवठा करावा. हे सरकार शेतकºयांच्या मालाला हमी भाव देत नसल्याने येणाºया काळात अजून मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या वाढतील. त्यामुळे कृषी मालाला हमीभाव देऊन तात्काळ कृषीकेंद्र सुरू करण्याची मागणी यावेळी राकॉच्या आंदोलकांनी केली. बीड तालुक्यातील कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *