👁 11 Views

पंढरीत दत्त जयंती उत्साहात साजरी



पंढरपूर Live 3 December 2017
पंढरपूर : आज चतुर्दशी दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठी असणार्‍या श्री विप्र दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी असंख्य भाविकांच्या ‘अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ च्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.





पंढरीतील ऐतिहासिक विप्र दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. आजच्या गाणगापूरच्या दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे. विप्र दत्तचे श्री बापुसाहेब विप्र यांना 175 वर्षांपूर्वी दृष्टांताद्वारे कृष्णा नदी तिरी एकमुखी दत्ताची स्वयंभू मूर्ती मिळाली. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती एकमुखी असून 6 हस्त आहेत. प्रतिवर्षी दत्त जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी होते. दत्त जयंतीनिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेतला. यावेळी दत्त जयंती सोहळ्यानंतर भाविकांना सुंठोवडा व लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *