जालना (प्रतिनिधी, भरत देशमुख):- जाफ्राबाद, जवखेडा जि. जालना येथे तीन कोटींहून अधिक किंमतीच्या वाळुची चोरी दिवसाढवळ्या होताना आढळूनही येथील महसुल विभाग कारवाई करत नाही.
तहसीलदारांच्या नाकाला शेंडा लावत येथे बिनदिक्कतपणे वाळु तस्करी केली जाते. महसुल खात्याचे अधिकारी नदीपाञात जाऊन वाळुचोरी झालेली पाहूनही संबंधीत वाळु माफिूयरांवर कारवाई करत नाहीत.
गावकरी मंडळींकडून वाळु चोरणारे टिप्पर पकडुन अधिकरार्यांना फोन लावून याबाबत माहिती दिली जाते तरीसुध्दा महसुलचे अधिकारी गप्प का बसतात? असा संतप्त सवाल या परिसरातील ग्रामस्थांमधून विचारला जात आहे? यासंदर्भात आता वरिष्ठ अधिकार्यांनीच योग्य ती दखल घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







