आटया-पाटया हा महाराष्ट्राच्या मातीचा सन्मान करणारा खेळ -रोहीत पवार
आटया-पाटया हा महाराष्ट्राच्या मातीचा सन्मान करणारा खेळ आहे.देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी सदैव खेळांबरोबर युवकांच्या कलागुुणांना वाव मिळावा यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत.कुस्ती असो अथवा क्रिकेट किवा कबड्डी सर्वच ग्रामिण खेळांना सदैव प्रोत्साहन दिले आहे.आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या वतीने गुरसाळे येथे जिल्हास्तरीय भव्य आटयापाटया स्पर्धांचे आयोजन करुन एक चांगला उपक्रम राबवीला आहे.असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहीत पवार यांनी केले आहे.गुरसाळे येथे विठ्ठल प्रशालेच्या प्रांगणात आयोजीत या स्पर्धेचे उदघाटन श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आलेया वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबीया हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विठ्ठल कारखान्याचे संचालक भगिरथ भालके यांनी भुषिवीले.
या स्पर्धांच्या उदघाटनप्रसंगी विठ्ठल कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मोहन कोळेकर,विठ्ठल कारखान्याचे संचालक समाधान काळे,भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक अनिल सावंत,सह.शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर कवडे,राष्ट्रवादी युवक कॉगे्रसचे कार्याध्यक्ष आप्पा थिटे,विठ्ठल कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी. पाटील, प्रा.आर.डी.पवार, उपसरपंच नवनाथ पवार, संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे,नगरसेवक प्रशांत शिंदे,नगरसेवक महादेव धोत्रे,युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील,डॉ.सचिन गुटाळ.किसन कोळेकर,शिवाजी पवार,नाना कवडे,विक्रम कोळेकर,नवनाथ पाटील,तुकाराम पाटील,नामदेव खरात,विलास कवडे,नवनाथ जाधव,श्रीकांत शिंदे,विक्रम लाटे,राजन जगताप,प्रशांत शिंदे,उमेश घोलप,दिपक शिंदे,नवनाथ चव्हाण,संतोष कवडे,कृष्णा घोलप आदी यांच्यासह शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचे सर्व पदाधिकारी,सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






