👁 5 Views

पंढरपूर नगरपालिकेने स्वेरीत स्वच्छतेबाबत जनजागृती केली



श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात‘स्वच्छता अॅप’वापराविषयी माहिती देताना आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, सोबत डावीकडून बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे आत्माराम जाधव,  पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, नागनाथ तोडकर, कुणाल देगलूरकर, स्वच्छता अभियान अॅपचे ब्रँड अँबेसिडर दत्तात्रय चंदनशिवे, उपप्राचार्य डॉ. एस.एन. कुलकर्णी, प्राचार्य प्रा. एन.डी. मिसाळ आदी
पंढरपूर Live 8 December 2017


स्वेरीच्या २५० स्टाफने केले ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोड

पंढरपूरः- पंढरपूर नगरपालिकातर्फे गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वच्छतेबाबत जनजागृती केली. यामध्ये स्वेरीच्या जवळपास २५० प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या मोबाईलमध्ये ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोड करून स्वच्छतेवर होत असलेल्या जनजागृती मोहिमेला हातभार लावला.







14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 


           प्रारंभी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांचे स्वागत करून स्वच्छतेविषयी भारतभर होत असलेल्या जनजागृती मोहिमेची माहिती दिली. पंढरपूर नगरपालिकेचे क्रियाशील मुख्याधिकारी डॉ अभिजित बापट (भा.प्र.से.) यांनी नगरपालिकेत पदभार हाती घेतल्यापासून पंढरपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जणू ध्यास घेतला असून याला प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी ‘स्वच्छता अभियान अॅप प्रोग्रॅम’ अंतर्गत होत असलेल्या जनजागृती मोहिमेबाबत सविस्तर माहिती देताना म्हणाले, ‘सामान्य नागरिकांचे केवळ आर्थिक व बौद्धिक विकास होवून प्रश्न सुटणार नाहीत यासाठी आरोग्याबाबत देखील नागरिकांनी जागृत होणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या प्रभागातील समस्या व प्रश्न ‘स्वच्छता अॅप’द्वारे मांडावेत. याप्रश्नांची व समस्यांची नगरपालिका प्रशासन दखल घेत असून यासाठी स्वच्छतेसंबंधी असणाऱ्या नगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यंत्रणा कामास लागली आहे. हे कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. स्वच्छता अॅपद्वारे आलेल्या नागरिकांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेतली जात आहे. आपण,आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांनी यासाठी पुढे येणे गरजेचे झाले आहे. या ‘स्वच्छता अॅप’चा प्रचार व प्रसार झाल्यास आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. यासाठी आपल्या मदतीच्या हातांची गरज आहे.’ आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे यांनी ‘स्वच्छता अॅप’ची डाऊनलोड करण्यापासून ते समस्या कसे मांडायचे ? याबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली.सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले, ‘सामान्य जनतेच्या समाज कार्यासाठी व विकासासाठी अभियांत्रिकीच्या प्रत्येक सदस्यांचे योगदान राहणार असून सुज्ञान नागरिक म्हणून प्रत्येक समाजकार्यासाठी कटिबद्ध राहू, असे आश्वासन दिले. शासन दरबारी स्वच्छतेविषयी समस्या व प्रश्न मांडायचे असेल तर आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर मधून swachhata-MoHUA हा अॅप’ डाऊनलोड करावा, पुढे आपले मोबाईल क्रमांक, परिसर व आदी पूरक माहिती नमूद केल्यानंतर अॅपचा वापर करता येणार आहे. पंढरपूर शहरात राहणाऱ्या स्वेरीच्या प्राध्यापकांनी प्रत्येकी पाच नागरिकांना या ‘स्वच्छता अॅप’विषयी माहिती देवून जनजागृती करत आहे. या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘स्वच्छता अॅप’विषयी अधिक महितीसाठी उपमुख्याधिकारी वाळूजकर (९८५०३८००३०) यांच्याशी संपर्क साधावा’ असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.यावेळी पाणी पुरवठा विभागाचे आत्माराम जाधव, नागनाथ तोडकर, कुणाल देगलूरकर, स्वच्छता अभियान अॅपचे ब्रँड अँबेसिडर दत्तात्रय चंदनशिवे, पालक संघाचे आबासाहेब दैठणकर यांच्यासह स्वेरीचे डिप्लोमा पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा. एन.डी. मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी, पदवी अभियांत्रिकीचे उपप्राचार्य डॉ. एस.एन. कुलकर्णी,अधिष्ठाता, विभागप्रमुख प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांनी मानले.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *