👁 9 Views

लवंगी येथील मुक्ताई बालगृहाची चौकशी करा..! संभाजी ब्रिगेडची मागणी..!!



पंढरपूर Live 9  December 2017

मुलांकडून अन्यायकारक कामे करुन घेतल्याबाबतची सबळ पुरावे संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा यांच्याकडे उपलब्ध असून मुक्ताई बालगृहाची चौकशी करुन संस्थाचालकावर येत्या 15 दिवसात कारवाई करावी. काही ठोस निर्णय न झाल्यास याविरोधात संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा तीव्र आंदोलन छेडणार आहे. अशा प्रकारचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल यादव आणि जिल्हा संघटक प्रमोद जगदाळे यांनी समाजकल्याण अधिकारी जि.प. सोलापूर यांना दिले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहामध्ये मतिमंद व निराधार मुलांना संस्थाचालक वैयक्तिक कामासाठी, स्वत:च्या घरी व बालगृहात राबवून घेत आहेत. तसेच या मुलांना सोई-सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. तसेच बालगृहात स्वच्छता नाही. त्यामुळे मुलांची निगा राखणे कठीण झाले आहे. त्यांचा पोषण आहार देखील निकृष्ट दर्जाचा असल्याने अनेकांना रोगांना बळी पडावे लागत आहे. बालगृहातील मुलांना येथील कर्मचार्‍यांकडून शारिरीक व मानसिक त्रास दिला जात आहे. बालगृहात तपासणीसाठी जेंव्हा अधिकारी येतात तेंव्हा पोषण आहार व इतर सोयी-सुविधा तात्पुरत्या व्यवस्थित असल्याचे दाखविले जाते; परंतु  त्यानंतर मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते. 





14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *