राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार व जनकल्याण फौंंडेशनचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पार्टीचे उपाध्यक्ष राजेंद्र हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. यावेळी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तथा सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांना आपल्या कार्यक्षेत्रात उल्लशेखनीय कामगिरी बजावल्याबाबत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर पंढरपूरचे सुपूत्र दैनिक पुढारी सोलापूरचे न्युज बिरो चीफ, पत्रकार श्रीकांत साबळे यांना त्यांनी आजपर्यंत पत्रकारितेतील लक्षवेधी कामगिरी केल्याबाबत पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
दि. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी साडे चार वाजता सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे हे असतील. सहाय्यक पोलिस आयुक्त सौ.पौर्णिमा चौगुले यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणारअसून यावेळी जयहिंद शुगर्स चे चेअरमन बब्रुवान माने-देशमुख, उद्योगपती विष्णु मोंढे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







