पंढरपूर Live 9 December 2017
सोलापूर:- सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत असून यासाठी 1 जानेवारी 2018 पासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील एकाच नोंदीत कामगाराला योजनेचा लाभ देण्यात येतो. सन 2016 व 2017 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन संबंधित पात्र लाभार्थींना लाभ देण्यात येत आहे. कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या व अर्ज प्राप्त झालेल्या 1676 बांधकाम कामगारांना रुपये 5000 प्रमाणे 83 लाख 80 हजार इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे.
अवजारे खरेदी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांनी अर्ज करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त, सोलापूर यांनी केले आले.
*****
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





