पंढरपूर Live 9 December 2017
मुंबई : आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांचा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज सत्कार केला. सायली जाधव यांना राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.
कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांनी आज क्रीडा मंत्री श्री. तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी या दोघींना प्रत्येकी सात लाख रुपयांचा धनादेश आणि शाल देवून श्री. तावडे यांनी सत्कार केला.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा उचित गौरव राज्य शासन करत आहेत. विविध पुरस्कारांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे, असेही श्री.तावडे यांनी सांगितले.
कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव यांच्या खेळाचे श्री. तावडे यांनी यावेळी कौतुक केले. महाराष्ट्राच्या या दोन्ही कबड्डी पट्टुंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जी संधी मिळाली, त्या संधीचे त्यांनी विजयात रुपांतर केले. या दोघींनी महाराष्ट्रासह भारताचे नाव कबड्डीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले, असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








