👁 10 Views

स्वेरीत ‘जेईई’ ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची मोफत सुविधा सुरु

पंढरपूर Live 9 December 2017

 पंढरपूर- १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर ‘अभियांत्रिकी’ या अभ्यासक्रमासाठी (सन २०१८ -१९) अत्यंत आवश्यक असणाऱ्या महाराष्ट्र शासनाची ‘जेईई’ या प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे ही परीक्षा एप्रिल २०१८ मध्ये होणार असून जेईईचे फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात  मोफत सोय केली असून याची १२ वी सायन्समधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच शासनाकडूनच सीईटी परीक्षेचे फॉर्म अद्याप सुरु झाले नसून ते सुरु झाल्यानंतर स्वेरीत भरण्याची सुवीध उपलब्ध होईल

      ‘अभियांत्रिकी’ बाबत अचूक माहिती मिळेलच हे सांगता येत नाही यामुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऑनलाईन परीक्षेचा फॉर्म अचूक भरण्यासाठी ‘अभियांत्रिकी’ बाबत संपूर्ण अभ्यास असणारी उच्च शिक्षित व तज्ञ प्राध्यापकांची यासाठी नियुक्ती केली आहे. यासाठी स्वेरी अभियांत्रिकीत मोफत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी विभागात सोय केली असून प्रवेश परीक्षेसंबंधी प्रा. यु. एल अनुसे (मोबा. क्र- ९१६८६५५३६५), विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (मोबा. क्र- ९५४५५५३८७८), प्रवेश अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात (मोबा. क्र- ९१५८३२५०५५), व तज्ञ प्राध्यापकांची नेमणूक केली आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र. १८०० ३००० ४१३१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *