पंढरपूर Live 11 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी) : भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंढे यांच्या जन्मदिनानिमित्त ‘आठवणीतील गोपीनाथराव’ या विषयावर भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षा नीता केळकर यांचे व्याख्यान मंगळवार दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. पंढरपुरातील हॉटेल ईन मध्ये आयोजित केल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी दिली.
गोपीनाथराव मुंढे यांचे पंढरपूरवर विशेष प्रेम होते. ते वारकरी सांप्रदायातील होते. 12 डिसेंबर हा गोपीनाथ मुंढे यांचा जन्मदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधून पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘आठवणीतील गोपीनाथराव’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. तरी या व्याख्यानासाठी पंढरपूर शहर तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील सर्व भारतीय जनता पार्टीच्या आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा मोर्चा, महिला आघाडी व विविध सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्टेशन रोडवरील हॉटेल ईन येथे मंगळवारी सकाळी 10.30 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी केले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर









