पंढरपूर Live 11 December 2017
देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्या शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे नाव असलेल्या अंधशाळेस नगरपालीकेने कुठलेही भाडे आकारु नये यासाठी आपण नगर पालीका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असून अंध विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे गिरविता यावेत व स्वावलंबी जीवन जगता यावे याउद्देशाने ही शाळा चालविली जात आहे.त्यामुळे या शाळेस भाडे माफ करावी या आमच्या मागणीबाबत न.पा.ने त्वरीत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा महिला कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे.कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध शाळेत कॉग्रेस (आय)ओबीसी विभागाच्या वतीने आयोजीत खाऊ वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की,कॉग्रेस हा सर्व जातीधर्मांना सोबत घेवून समाजातील उपेक्षीत घटकांना न्याय देण्याची जबाबदारी कर्तव्य भावनेने पार पाडत आलेला पक्ष आहे.या पक्षाच्या दोन प्रबळ महिला नेत्यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आहे.कॉग्रेस आय प्रणित ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी यांनी पदभार घेतल्यानंतर अनेक चांगले उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.आज या शाळेत वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवून ओबीसी विभागाने एक चांगला संदेश दिला आहे.
या कार्यक्रमास महिला कॉग्रेसच्या प्रदेश जनरल सेक्रेटरी डॉ.साधना उगले,जेष्ठ कॉग्रेस नेते मामा फलटणकर,कॉग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले,संदीप माने,माजी शहराध्यक्ष सुहास भाळवणकर,गणेश माने,द.बडवे,अशपाक सय्यद,किशोर खिलारे,अभिषेक शहा,प्रा.मसुरे,गोसावी सर ,समाधान रोकडे,शिवाजी धोत्रे,बाळासाहेब आसबे,तात्या देवकर,संदीप मुटकुळे,महेश जाधव,अनंत मेनकुदळे,सोमेश अभंगराव आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मारुती भोसले यांनी केले तर शेवटी आभार कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमर सुर्यवंशी यांनी मानले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








