👁 9 Views

नवविवाहितेचा निघृण खून करून मृतदेह जाळला…



पंढरपूर Live 10 December 2017

नवविवाहितेचा निघृण खून करून मृतदेह जाळला…

मोहोळ : प्रेमविवाह मान्य नसल्याच्या कारणावरून १९ वर्षीय नवविवाहितेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह घराच्या मागेच जाळण्यात आल्याची खळबळजनक घटना येवती ता. मोहोळ येथे लेंडवे वस्तीवर शनिवारी (ता. ९) पहाटे तीनच्या सुमारास घडली. रेखा श्रीकृष्ण लेंडवे (वय १९) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. 


या प्रकरणी सासू, सासरा व दीर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सुभाष औदुंबर लेंडवे (सासरा), जनाबाई सुभाष लेंडवे (सासू) व प्रशांत सुभाष लेंडवे (तिघे रा. येवती ता. मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून पोलिसांनी तिन्ही संशयितांना तात्काळ अटक केली आहे.


 यासंदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रेखा व श्रीकृष्ण यांचा विवाहा अगोदर परिचय होता. त्यांचे फोन वरून एकमेकांना बोलणे होत होते. परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले. श्रीकृष्ण हा रेखाचा नात्याने मावस भाऊ आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी श्रीकृष्ण रेखाला घरी घेऊन जातो, असे सांगून तिला घेऊन गेला व त्यानंतर त्या दोघांनी विवाह केला. विवाह केल्याचे फोटो व्हॉट्सअॅपवरून जमदाडे कुटूंबाला पाठवले. परंतु हा विवाह लेंडवे कुटुंबातील रेखाचा सासरा, सासू व दीर याना मान्य नव्हता. त्यामुळे ते रेखावर चिडून होते. त्यांनी याच कारणामुळे द्वेषापोटी रेखाला संपविण्याचा बेत आखला. दरम्यान शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास रेखाच्या सासू, सासरे व दीर यांनी तिचे हात पाय तारेने बांधून तिला गळफास दिला. 


तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह राहत्या वस्तीच्या मागे नांगरटीत जाळून टाकला व पुरावा नष्ट केला. नंतर रेखाच्या वडिलांना फोन करून तुमच्या पोरीने स्वतः गळफास घेतल्याचे सांगितले. याबाबत मुलीचे वडील रघुनाथ रावसाहेब जमदाडे (वय ५१, रा. येळवी, ता. जत, जि. सांगली) यांनी मोहोळ पोलिसात वरील तिघांविरोधात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव हे करीत आहेत. दरम्यान, या संदर्भात पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ताब्यात घेतलेली मृताची हाडे व राख यांची डीएनए तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवणार आहे.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *