👁 11 Views

उपसरपंच निवडीची सर्वत्र जोरदार तयारी! समसमान बालाबल झाल्यास सरपंचांला निर्णायक मताचा हक्क

पंढरपूर Live 11 December 2017
◆ महादेव गित्ते परळी वैजनाथ /प्रतिनिधी.     ग्रामीण भागातील महत्त्वाचे राजकीय प्रतिष्ठा असलेल्या सरपंचाच्या थेट जनतेतून निवडीनंतर आता उपसरपंच निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.उपसरपंच निवडीची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असून संख्याबळ आपल्या बाजूने करण्यासाठी इच्छुक कामाला लागले आहेत. दरम्यान समसमान बालाबल झाल्याससरपंचांला  निर्णायक मताचा हक्क असल्याने सरपंच ही फॉर्मात आहेत. 
        उपसरपंचाची निवडणूक ही ग्रामपंचायतीच्या वार्ड (प्रभाग) मधून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या निवडणुकीच्या फेरीत सरपंच यांना मतदानामध्ये भाग घेता येणार नाही. मात्र निवडणुकीच्या या फेरीतील  उपसरपंच निवडणुकीत समसमान मते पडल्यासच सरपंच यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. 
      परळी तालुक्यातील 79 ठिकाणी निवडणूक झाली. यातील बोरखेड येथील एक सरपंच पद रिक्त आहे.सरपंच थेट जनतेतून निवडून आले आहेत. आता उपसरपंच निवडणूक होत आहे.  अनेक ग्रामपंचायतीत सरपंच एका पक्षाचे आणि ग्रामपंचायतीत बहुमत दुसर्‍या पक्षाचे अशी स्थिती आहे. अनेक ग्रामपंचायतीत सदस्यांमध्ये सरपंच विरोधकांचे बहुमत आहे. त्यामुळे उपसरपंच निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. उपसरपंच निवडणुकीत सरपंच यांच्या मताच्या अधिकाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. 
त्यावर शासनाचे मार्गदर्शन आले आहे. त्यात म्हटले आहे की, शासनाने दि. 1 सप्टेंबर 2017  रोजी  पुनर्प्रख्यापित केलेल्या अध्यादेशानुसार कलम 30 अ-1अ  अन्वये निवडून आलेला सरपंच हा पदसिद्ध सदस्य असेल आणि पोटकलम 33 मध्ये सुधारणा करून पोट-कलम 6(4) अन्वये उपसरपंचाच्या निवडणुकीत समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल अशी तरतूद केलेली आहे.  
      त्यावरून “उपसरपंच यांची निवडणूक ही ग्रामपंचायतीच्या वॉर्ड (प्रभाग) मधून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या निवडणुकीच्या फेरीमध्ये सरपंच यांना मतदानामध्ये भाग घेता येणार नाही. मात्र या फेरीतील उपसरपंचाच्या निवडणुकीत समसमान मते पडल्यासच सरपंच यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार उपसरपंच निवडणुकीबाबत कार्यवाही करावी”, असे मार्गदर्शन  दिले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ते पाठविले आहे.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *