पंढरपूर Live 11 December 2017
घटनास्थळी जाण्यापासुन रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न; मृतांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
परळी वै.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाचा हौद फुटुन झालेली दुर्लघटना अतिशय दुर्देवी आहे. घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यु होऊनही अद्यासाधा गुन्हा ही दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाख करण्याची मागणी विधान विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे.
शुक्रवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी आज मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारखाना प्रशासनाच्या दबावाखाली येऊन पोलिस प्रशासनाने श्री.मुंडे यांना घटनास्थळी जाण्यापासुन रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर लोकप्रतिनिधींना घटनास्थळी जाऊ न देण्याचा हा प्रकार पोलिस मंत्र्यांच्या दबावाखाली करीत असनु, या प्रकरणी आपण सभागृहात आवाज उठवु असे सांगितले. या घटनेत मृत्यु झालेल्या लिंबोटा, देशमुख टाकळी, गाढे पिंपळगावं येथील कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवुन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. घटनेत मृत झालेले कर्मचारी हे घरातील प्रमुख असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या कुटूंबियांना ताताडीने 10 लाख रूपयांची मदत द्यावी तसेच जखमींना 5 लाख रूपये मदत देण्याची मागणी ही त्यांनी केली. घटनेचे आपल्याला राजकारण करायचे नाही मात्र ज्या पध्दतीने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न झाला ते पाहता कारखाना प्रशासनच या घटनेत जबाबदार असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष
डॉ.संतोष मुंडे, मार्केट कमिटीचे सभापती सुर्यभान नाना मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ.मधुकर आघाव, जिल्हा उपाध्यक्ष माऊली गडदे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








