👁 12 Views

कोथरुळ – हिवरा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून रस्त्यावरील काटेरी झाडे झूडपे हटवली ; रस्त्याची महाभयानक दयनीय अवस्था

पंढरपूर Live 11 December 2017
परळी ,माजलगाव  विधानसभा लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 
◆ महादेव गित्ते
परळी वैजनाथ /प्रतिनिधी. .
माजलगाव तालुक्यातील कोथरुळ व परळी तालुक्यातील हिवरा  ( गोवर्धन  ) ह्या गावा अंतर्गत असणारा पाच ते सहा किलोमीटर रस्त्याची महाभयानक दैनिय अवस्था झाली असुन हा रस्ता बाभळी काटेरी झाडे झुडपांच्या विळख्यात सापडला होता, वाहने चालवणे व पायाने चालने अवघड झाले होते. 
संबंधित लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने कोथरुळ व हिवरा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जेसीबी यंत्रा व्दारे ह्या रस्त्या लगतची बाभळी काटेरी झाडे झुडपे हटवली आहेत.माजलगाव व परळी ह्या दोन मतदार संघाना जोडणारा हा मार्ग आहे. ह्या मार्गा व्दारे परळी व माजलगाव यांच्यातील अंतर इतर मार्गा पेक्षा कमी आहे. पंधरा वर्षांपूर्वी हा रस्ता बनवला होता परंतु पुन्हा ह्या रस्त्याकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. माजलगाव व परळी ह्या दोन्ही मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींनी नेहमीच दुर्लक्ष केले असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कोथरुळ ग्रामस्थांनी ह्या रस्त्या संबधी संबंधित लोकप्रतिनिधींचे सतत उबंरठे झिजवले परंतु काही सकारात्मक प्रतिसाद आला नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटलं आहे. वाहतूक  , रहदारी करण्यास फारच अडचण होत असल्याने नाईलाजास्तव अखेर कदरुन कोथरुळ व हिवरा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे हटवली. रस्ता काटेरी झाडा झुडपातून जरी मुक्त झाला असला तरी रस्ता वागण्याच्या लायक नाही. कारण रस्ता  १०० % उखरला आहे पुर्वी ची दबलेली खडी रस्त्यावर पसरली आहे. सायकल  , दुचाकी   ही वाहने तर चालवणे शक्यच नाही. 
*विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी जाणे झाले अवघड* :
 कोथरुळ गावचे शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनी शिक्षणासाठी हिवरा  ( गोवर्धन  ) व सिरसाळा येथे जातात. रस्ता वागणे योग्य राहिला नसल्याने परळी व माजलगाव आगाराच्या बस बंद झाल्या आहेत, खाजगी वाहने सुद्धा ह्या मार्गावर रहदारी करण्यास नकार देतात, नाईलाजास्तव विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनी ला खडी तुडवत शिक्षणासाठी  रस्त्यावरुन पायपीट करावी लागते
*पालकमंत्री ताई व आमदार जिजांनी ह्या रस्त्यावरुन एक वेळ यावे*  : 
कोथरुळ- हिवरा ह्या रस्त्यावरुन एक वेळ जिल्ह्याच्या पालकमंत्री व माजलगाव आमदार जिजा यांनी एक वेळी आपल्या व्हिआयपी एसी गाड्याने यावे अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी केली आहे. कारण ह्या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे किती अवघड आहे हे त्याना समजून येईल.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *