👁 10 Views

शिक्षक दाखवायचा विद्यार्थीनीनां अश्लिल छायचिञ:पालकाच्या तक्रारी नतंर गुन्हा दाखल:शैक्षणिक क्षेञात खळबळ

पंढरपूर Live 11 December 2017
निलेश चाळक बीड-तिसरी- चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनींना एक शिक्षक मोबाइलवर चक्क अश्लिल छायाचित्र दाखवत असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील ढोरवाडी शाळेत रविवारी उघडकीस आला आहे या घटनेने शैक्षणिक क्षेञात खळबळ उडाली आहे पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास जेरबंद करण्यात आले. दिगंबर शिंदे असे त्या शिक्षकाचे नाव असून या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तिसरी- चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनींना वेगळ्या खोलीत बोलावून दिगंबर शिंदे अश्लिल छायाचित्रे आपल्या मोबाइलवर दाखवत असे. मुलींना कपडे उतरवायला लावून त्यांच्याशी तो गैरवर्तनही करायचा. शुक्रवारीही त्याने दुपारी तीन वाजता चार मुलींना खोलीत नेऊन अश्लिल छायाचित्रे दाखवली. मुलींनी कुतुहल म्हणून प्रश्न विचारल्यानंतर त्याने ‘त्यासाठी लग्न करावे लागते’ असे स्पष्टीकरण दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. शनिवारी चौथीच्या वर्गातील एका मुलीनं हा प्रकार आपल्या आजीला सांगितला. त्यानंतर ही माहिती आजोबांना कळाली. त्यांनी रविवारी वडवणी ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन शिक्षक शिंदे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्याला रात्रीच अटक केली असून सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *