पंढरपूर Live 11 December 2017
येथील जयराज ग्रुप व नक्षत्र क्रिकेट क्लब आयोजीत बॉस चषक पुणे पोलीस क्रिकेट टिमने पटकावला आहे. आ.भारत भालके यांंच्या हस्ते कर्णधार प्रशांत गायकवाड व सहकार्यांना हा चषक प्रदान करण्यात आला.या स्पर्धेत गुजरात एलेव्हन टिम द्वितीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे.या संघाचे कर्णधार महेश गोयल यांच्यासह संघाचाही आ.भारत भालके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आ.भारत भालके म्हणाले की,युवकांनी शिक्षणाबरोबरच खेळासही प्राधान्य दिले पाहीजे,मैदानी खेळ हे आपले शारीरीक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात.आपल्यातील आत्मविश्वास वाढवितात.समाजेसवक महादेव धोत्रे मित्रमंडळ व जयराज ग्रुप, नक्षत्र क्रिकेट क्लबने या स्पर्धेचे आयोजन करुन पंढरीतील क्रिकेटप्रेमींनी मोठी स्पर्धा पाहण्याची संधी उपलब्ध केली त्यांचे हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
यावेळी महादेव धोत्रे(बॉस),नगरसेवक सुधीर धोत्रे,कॉग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले,समाजसेवक संजय बंदपट्टे,डि.राज सर्वगोड,दत्ता भोसले, दादा पवार,दिपक येळे, रामा चौगुले यांच्यासह जयराज ग्रुप मधील सर्व कार्यकर्ते व नक्षत्र क्रिकेट संघाचे खेळाडू व कार्यकर्ते उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








