पंढरपूर Live 11 December 2017
दोन दिवस चालणार प्रदर्शन
पंढरपूर– कासेगाव (ता.-पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संचलित लोटस इंग्लिश स्कुलमध्ये उद्या बुधवार (दि.१३ डिसेंबर २०१७) व गुरुवार (१४ डिसेंबर) या दोन दिवशी पंढरपूर तालुका पंचायत समिती तर्फे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती लोटसच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी दिली.
स्वेरीच्या धर्तीवर पादाक्रांत करत असलेल्या व अल्पावधीत विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाची प्रचिती देणाऱ्या लोट्स इंग्लिश स्कुलकडे अधिक लक्ष वेधल्यामुळे पंढरपूर पंचायत समितीने देखील लोट्स मध्येच विज्ञान प्रदर्शन आयोजिण्यावर शिक्का मोर्तब केला आहे. लोट्स इंग्लिश स्कूलची स्थापना २०१० साली झाली असून स्थापनेपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवीत असताना विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकालाबरोबरच इंग्रजी संभाषणमध्ये देखील गरुडझेप घेतल्याचे दिसून येते आणि असा चर्चेत असणाऱ्या प्रशालेत विज्ञान प्रदर्शन भरत आहे. येत्या बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवशी पंढरपूर तालुक्यातील विज्ञान शिक्षकांना बौद्धिक मेजवानी मिळणार आहे. ‘शास्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या मुख्य विषयाला अनुसरून असलेल्या प्रदर्शनाचे उदघाटन बुधवार सकाळी १०.०० वाजता पंढरपूर तालुका पंचायत समितीचे सभापती दिनकर नाईकनवरे यांच्या शुभहस्ते तसेच गटविकास अधिकारी (वर्ग १) ज्ञानप्रसाद घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी सौ.सुलभा वटारे, पंढरपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी लवटे, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, अध्यक्ष बी.डी.रोंगे, कोषाध्यक्ष दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, केंद्रप्रमुख सौ.मोहिते व विज्ञान परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीप्रसाद मोहिते हे देखील या भव्य विज्ञान प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते आठवी, उच्च प्राथमिक, माध्यमिक (इ.९ वी ते इ.१२ वी), शिक्षक प्राथमिक, शिक्षक माध्यमिक व प्रयोगशाळा परिचर असे विभाग प्रदर्शनात असणार आहे. यात एकूण १८० शाळा समावेश होतील. याचा समारोप गुरुवारी म्हणजे १४ रोजी दुपारी उपसभापती अरुण घोलप यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








